शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहर झाले भगवेमय

By admin | Updated: September 29, 2016 05:56 IST

गुरुवारी शहरात होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी झाली असून, या मोर्चासाठी जवळपास ५ लाखांहून अधिक बांधव उपस्थित राहणार आहेत. या संख्येमध्ये वाढदेखील होईल, असे

बारामती : गुरुवारी शहरात होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी झाली असून, या मोर्चासाठी जवळपास ५ लाखांहून अधिक बांधव उपस्थित राहणार आहेत. या संख्येमध्ये वाढदेखील होईल, असे आयोजकांनी सांगितले. सकाळी ११ वाजता मूक मोर्चा निघाल्यानंतर नियोजित मार्गाने मिशन हायस्कूलच्या पटांगणात साधारणत: २ तासांत पोहोचेल. त्या ठिकाणी ५ महाविद्यालयीन मुली निवेदनाचे वाचन करणार आहेत. याच मुली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. शहरात ‘एक मराठा लाख मराठा’ घोषवाक्य असलेल्या कमानी सजल्या आहेत. दुचाकी, चारचाकी गाड्यादेखील याच घोषवाक्याने रंगल्या आहेत. आज भगवा झेंडा खरेदीसाठी तरुणांसह महिलांची देखील तीन हत्ती चौक, भिगवण रोड येथे गर्दी झाली होती. मोर्चा आयोजकांनी दुकाने खुली ठेवण्याचे आवाहन केले असले, तरी मोर्चातील गर्दीला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर गुरुवार आठवडे बाजारदेखील बंद राहणार आहे, असे भाजीपाला विक्रेता असोसिएशनने सांगितले. मोर्चासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जवळपास ७५० अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव दलाची तुकडीदेखील मागविण्यात आली आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले. आजपासूनच कसबा शिवाजी उद्यानपासून ते शहरातील चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. (प्रतिनिधी)शाळा, महाविद्यालयांना सुट्टी...खासगी शाळा, महाविद्यालयांना गर्दीमुळे मुलांना येता येणार नाही. त्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. मोर्चात येणाऱ्यांसाठी वाहतूकव्यवस्था देखील करण्यात आली आहे. वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या वाहनांना बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. तसेच, हातगाडी, पथारी व्यावसायिकांना पोलिसांनी बंदी घातली आहे. मोर्चाला अनेकांचा पाठिंबा....या मोर्चाला बारामतीतील विविध समाज संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चासाठी बारामती शहर व तालुक्यातून विविध समाज व संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र तहसीलदार हनुमंत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहेत. यामध्ये धनगर समाज, बारामती वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट, वीरशैव लिंगायत युवक संघटना, दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, पणदरे आदींचा समावेश आहे.