शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंडांना पोलिसांचेच अभय

By admin | Updated: September 14, 2015 04:39 IST

चिटफंड चालविणाऱ्या कंपन्यांचे थेट पोलिसांशीच साटेलोटे असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात हा धंदा तेजीत सुरू आहे. चिटफंडांना पोलिसांचेच अभय आहे.

विश्वास मोरे , पिंपरी चिटफंड चालविणाऱ्या कंपन्यांचे थेट पोलिसांशीच साटेलोटे असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात हा धंदा तेजीत सुरू आहे. चिटफंडांना पोलिसांचेच अभय आहे. फसवणूक होऊन माया गोळा करून कार्यालयास टाळा ठोकून पसार होईपर्यंत कोणताही चिटफंड मालक पोलिसांच्या हातात सापडत नाही. फसवणूक झालेल्यांना केवळ पोलीस आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे हाती काहीही पडलेले नाही. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे. येथे कष्टकरी कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. कमी गुंतवणुकीत कमी वेळेत अधिक पैसे मिळताहेत असे कोणी आमिष दाखविले की, कामगारवर्ग निश्चितच आकर्षिक होतो. कष्टकऱ्यांची ही मानसिकता ओळखून चिटफंड चालकांनी आपला धंदा जोरात सुरू ठेवला आहे. दर आठवड्याला चिटफंड गैरव्यवहाराचे किमान एक प्रकरण उघडकीस येऊनही फसणाऱ्यांचे प्रमाण वाढतेच आहे. फसवणूकप्रकरणी साईप्रसाद चिटफंडाचे प्रमुख बाळासोहब भापकर, मुलगा शशांक भापकर आणि वंदना पत्नी यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला भापकराच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फसवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.गाववाल्यांचेच काळे धन अधिकचिटफंडातील काही कंपन्या गाववाल्यांपैकी काहींनी सुरू केलेल्या आहेत. चिंचवड, पिंपरी आणि भोसरीतील चिटफंड काही गाववाले चालवितात. तर काहींना या शहरातील सत्ताधारी नेत्यांचे पाठबळ आहे. भिशी आणि जादा व्याजाचे आमिष दाखवून या चिटफंड मालकांनी स्थानिक शेतकऱ्यांना जाळ्यात ओढले आहे. त्यांनी आपल्याच गावचा माणूस आहे, कोठे जाईल, असा विश्वास ठेवून कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. अवधूत चिटफंडची फसवणूक उघडकीस आल्यानंतर प्लॉटिंग आणि शेतजमीन विकून आलेले पैसे गुंतवणूकदारांची झोप उडविली आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पुनावळे, ताथवडे, रावेत, वाकड, हिंजवडी येथील अनेक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. काही लोकांनी पंचवीस लाख ते शंभर कोटींपर्यंतची गुंतवणूक केली आहे. चिटफंड चालकांनी काळ्या धनावरच डल्ला मारल्याने दाद मागायची कोणाकडे अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशी होते फसवणूकमार्केटिंगचे विविध फंडे चिटफंड चालक आजमावितात. चेन पद्धतीने आणि कमिशन तत्त्वावर हा कारभार चालतो. भिशी योजना किंवा अधिक व्याजाचे आमिष दाखविले जाते. अमूक रकमेची गुंतवणूक करा. त्यावर आपणास दोन वर्षांत दामदुपट्ट पैसे मिळतील किंवा एक हजार रुपये गुंतवले, तर करोडपती कसे होता येईल, असे दर्शविणारा माहितीचा आणि आकड्यांचा खेळ करणारा, करोडपती होण्याचे चार्ट नागरिकांना दाखविले जातात. आपण स्वत: गुंतवणूक करून आणखी पाच जणांना आणि त्या प्रत्येकांना आणखी पाच जणांना आणले की, आपणास लाख रुपयांचा चेक मिळेल. तसेच दुबई, बँकॉक किंवा मलेशिया अशी परदेशवारीही करता येईल. असे स्वप्न दाखविले जात असल्याने त्या आमिषाला काही लोक बळी पडतात. लखपती किंवा करोडपती होण्याच्या नादात अनेक जण फसतात. कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्याची वेळअनेक चिटफंड किंवा भिशीचालक सामान्यांच्या स्वप्नांचा चुराडा करून कोट्यवधींची माया गोळा करून पसार झाले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांना फक्त पोलीस ठाण्यांच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे हाती काहीही पडलेले नाही. पोलीस आणि चिटफंड चालकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने कार्यालय सुरू असेपर्यंत तक्रारींची दखल घेतली जात नाही. हे प्रकरण आमच्या अखत्यारीत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जाते.पंचवीसहून अधिक कंपन्याशहरात पंचवीसहून अधिक चिटफंड कंपन्या आहेत. त्यात स्थानिकांच्या पाच ते सहा आणि अन्य कंपन्या महाराष्ट्राबाहेरील आहेत. आलिशान कार्यालये, सुटाबुटातील इंग्रजीत बोलणारे कर्मचारी पाहून कोणालाही भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. सहा महिने ते दोन वर्षे अशा कालखंडात जाळे पसरून फसवणूक करून सुमारे आठ ते दहा कंपन्यांनी पोबारा केलेला आहे.