शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा प्रकरणी मुख्य उत्पादक छाजेड बंधुंना मुंबईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST

पुणे : पुणे पोलिसांनी गुटखा विरोधी मोहिमेअंतर्गत गुजरात राज्यातील वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्व्हासा या ठिकाणी छापे टाकून ...

पुणे : पुणे पोलिसांनी गुटखा विरोधी मोहिमेअंतर्गत गुजरात राज्यातील वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्व्हासा या ठिकाणी छापे टाकून तब्बल १५ कोटी रुपयांहून अधिकचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी सिल्व्हासा येथील कारखान्यात गुटख्याचे उत्पादक करणार्या छाजेड बंधुंना पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून शहरात येणार्या गुटख्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

अभिषके सुरेंद्र छाजेड (वय ३१) आणि शरण सुरेंद्र छाजेड (वय २६, रा. ग्रीन एकर, लोखंडवाला कॉम्पेक्स) अशी अटक केलेल्या मुख्य उत्पादकांची नावे आहेत. याप्रकरणी अनुष्का ट्रान्सपोर्टचा प्रदीप शर्मा, सुरक्षा व्यवस्थापक संतोषकुमार चौबे, मिथून नवले (रा. गणेशनगर), विकास कदम (रा. मांजरी), सतीश वाघमारे (रा. उंड्री) यांनाही अटक करण्यात आली आहे.

सिल्व्हासा येथील गलोंडत्त गावात ज्या कारखान्यात गुटख्याचे उत्पादन होते. ती जागा गोवा गुटख्याचे मालक जगदीशप्रसाद जोशी यांच्या मालकीची आहे. छाजेड बंधुंनी ती भाडेतत्वावर घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांची काशी व्हेंचर्स नावाने कंपनी आहे.

पुणे पोलिसांनी मागील दोन महिन्यात २८ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा जप्त केला होता. त्यातील आरोपींच्या चौकशीत हा गुटखा वापी व दादरा नगर हवेली येथून येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी कारवाई करुन १५ कोटींहून अधिकचा माल जप्त केला होता. कारखान्यात संतोषकुमार चौबे हा सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम पहात होता. कारखान्यात तयार होणारा गुटखा कोठे पाठविला जातो, याची आवक जावकाची सर्व माहिती चौबे ठेवत असे. तो ही माहिती छाजेड बंधुंना पाठवित असे, अशी माहिती तपासात पुढे आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मुंबईत लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे कारवाई करुन छाजेड बंधुंना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणात आणखी काही बडी नावे समोर येण्याची शक्यता आहे.