शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याच्यावर दोषारोप पत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर नोकरीच्या काळात उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा अपसंपदा बाळगल्याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर नोकरीच्या काळात उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तब्बल ४० हजार पानांचे पहिले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. उत्पन्नापेक्षा तब्बल १२०० टक्के अधिक ८२ कोटी ३४ लाख ३४ हजार ९३९ रुपये अधिक बाळगल्याचा आरोप या दोषारोपात करण्यात आला आहे.

हनुमंत नाझीरकर, संगीता नाझीरकर, गीतांजली नाझीरकर, भास्कर नाझीरकर, राहुल खोमणे, अनिल शिपकुळे, बाळासाहेब घनवट आणि विजयसिंह धुमाळ अशा ८ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यापैकी हनुमंत नाझीरकर आणि राहुल खोमणे यांना अटक करण्यात आली असून, ते दोघे ३० मार्चपासून न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत.

हनुमंत नाझीरकर हे नगररचना विभागामध्ये अमरावतीला सहसंचालक म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांना निलंबित करण्यात आले आहे. २३ जानेवारी १९८६ ते १८ जून २०२० या ३४ वर्षामध्ये त्यांनी तब्बल ८२ कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता लाचखोरीतून मिळविल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता तब्बल ११६२ टक्के अधिक आहे.

हनुमंत नाझीरकर याच्या ३८ कंपन्या व त्यातील गुंतविलेला पैसा याविषयी दुसरे स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच, त्याच्या २० बेनामी मालमत्ताही आढळून आल्या आहेत. त्याबाबतची वेगळी कारवाई आयकर विभागामार्फत करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सकाळी न्यायालय सुरू होण्यापूर्वीच ही सर्व कागदपत्रे न्यायालयात आणली होती. त्यामुळे कामकाज सुरू होताच ती दाखल करण्यात आली.

पत्नी, सासऱ्यांच्या नावावर मालमत्ता

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज हे दोषारोपपत्र शिवाजीनगर येथील न्यायालयात दाखल केले आहे. हनुमंत नाझीरकर याने ही मालमत्ता २०१० ते २०१६ दरम्यान आपली पत्नी आणि सासरे यांच्या नावावर खरेदी केली आहे. त्यातील किमती या त्याने ज्यावेळी या मालमत्ता खरेदी केल्या, त्यावेळच्या आहेत. या सर्व मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी असल्याने आजच्या बाजारभावानुसार त्यांच्या किमती दुप्पट ते तिप्पट झाल्या असतील.