शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चपळगावकर, मोरेंचे नाव चर्चेत

By admin | Updated: July 7, 2015 04:32 IST

विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी नाकारल्याने साहित्य महामंडळाने अध्यक्षपदासाठी नव्याने शोधमोहीम सुरू केली आहे.

पुणे : विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी नाकारल्याने साहित्य महामंडळाने अध्यक्षपदासाठी नव्याने शोधमोहीम सुरू केली आहे. चार वर्षांनी संमेलनाचा ‘विश्व’ योग अंदमानला जुळून येत आहे. अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, शेषराव मोरे यांच्या नावांची चर्चा आहे. जोहान्सबर्ग आणि टोरांटो येथे होणाऱ्या विश्व संमेलनासाठी े ना. धों. महानोर यांची निवड करण्यात आली होती. मात्र, दोन्ही संमेलने रद्द होण्याची नामुष्की ओढवल्याने अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळू शकला नाही. २० डिसेंबर २०१४ रोजी महामंडळास पत्र पाठवून त्यांनी भूमिका सविस्तरपणे मांडली. राज्यात तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत संमेलानध्यक्षपद भूषविणे योग्य वाटत नाही. त्यामुळे संमेलनाला जाण्यापेक्षा शेतीवाडीच्या प्रश्नांकडे मी जास्त गांभीर्याने पाहतो. मध्यंतरी खूप आजारी होतो. डॉक्टरांनी काही पथ्य पाळण्यास सांगून आरामाचा सल्ला दिला होता. विश्वसंमेलनापेक्षा मला शेती महत्त्वाची वाटते, माझ्या अडचणी समजून घ्याव्यात, हे माझे म्हणणे विचारात घ्यावे, असे सांगत संंमेलनाध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे आता विश्व संमेलनासाठी साहित्यिक शोधण्याची वेळ महामंडळावर आली आहे. तयारीसाठी दोनच महिने> स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीचे औचित्य साधत यंदाचे संमेलन अंदमान येथे होत आहे. हे संमेलन आॅक्टोबरमध्ये होत असल्याने संमेलनाच्या तयारीसाठी केवळ दोन महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर अध्यक्षपदाची शोधमोहीम सुरू झाली आहे. > आॅगस्टमध्ये महामंडळाची बैठक होत असून त्यात काही नावे ठेवली जाणार आहेत. त्यातील एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.