भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:45 IST2024-12-17T14:43:50+5:302024-12-17T14:45:18+5:30

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे

chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

बारामती : ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने सकल ओबीसी समाजाच्या वतीने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे राज्यातील सकल ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाला सकल ओबीसी मतदारांनी भुजबळ यांच्या आदेशाने ९७ ते ९८ टक्के मतदान केले. असे असताना ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे. हा राज्यातील ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय आहे. हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्याचे ओबीसी समाजाने निवेदनात नमुद केले आहे. या निवेदनावर ज्ञानेश्वर काैले, अनिल लडकत, निलेश टीळेकर, किशोर हिंगणे, बापुराव लोखंडे, संजय गिरमे, दत्ता लोणकर, बापु बनकर, महावीर लोणकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.