अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल; कुकडेसोबत १ कोटींची देवाणघेवाण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:11 IST2025-05-12T15:10:21+5:302025-05-12T15:11:31+5:30

दीपक मानकरांनी बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Case registered against Ajit Pawar group's Pune city president Deepak Mankar; Exchange of Rs 1 crore with Kukde? | अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल; कुकडेसोबत १ कोटींची देवाणघेवाण?

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल; कुकडेसोबत १ कोटींची देवाणघेवाण?

पुणे: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या अडचणी वाढल्यात. शंतनू कुकडे प्रकरणात नाव आल्यानंतर पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले दीपक मानकर हे चर्चेत आले. याच दीपक मानकरांनी बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. अशातच पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर गुन्हा दाखल झाल्यानं पुणे शहराच्या राजकारणात मोठी चर्चा होऊ लागली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा शंतनू कुकडे हा राज्य उपाध्यक्ष होता. या शंतनू कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार अटक केली होती. या संदर्भात पोलिसांनी शंतनू कुकडेची अधिक तपासणी केली असता त्याच्या बँक खात्यावरून शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आलं.

त्यामुळे पोलिसांनी याबाबत दीपक मानकर यांना काही दिवसांपूर्वी चौकशीला बोलावलं होतं. यावेळी दीपक मानकर यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. तसंच या संदर्भात दीपक मानकर यांनी काही कागदपत्र पोलिसांसमोर सादर केली. पोलिसांनी मानकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली आणि ती कागदपत्र बनावट असल्याचं त्यांना आढळून आलं. आणि इथेच दीपक मानकर यांच्या अडचणी खऱ्या अर्थानं सुरू झाल्या. त्यानंतर दीपक विरोधात बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात शंतनू कुकडेवर परदेशी महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी शंतनू कुकडेला अटक केली होती. आणि त्यावेळी तपासा दरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरून कोट्यावधी आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांना तपासा दरम्यान आढळून आलंय. आरोपी चंतनू कुकडेचा सीए रौनक जैन याच्या खात्यामधून मानकर पिता-पुत्रांच्या बँक खात्यामध्ये जवळपास पावणे दोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी याच शंतनू कुकडेच्या प्रकरणामध्ये दीपक मानकर यांची चौकशी झाली होती. आणि आता बनावट कागदपत्रांच्या साहाय्यानं जमीन व्यवहार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले

जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो याच्यासोबत झाला. आणि त्याची कायदेशीर इसार पावती देखील आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. असं दीपक मानकर यांनी त्यावेळी म्हटलं होतं. दरम्यान आता याच प्रकरणामध्ये दीपक मानकर यांनी पोलिसांना जी कागदपत्र सादर केली आहेत. तीच बनावट असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Web Title: Case registered against Ajit Pawar group's Pune city president Deepak Mankar; Exchange of Rs 1 crore with Kukde?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.