शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

काळजीवह..! पुणे जिल्ह्यातील भूजल साठे जीवाणूंनी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 12:20 IST

पुणेकर तसे स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत तसे चांगलेच जागरुक आहे. ते सध्याच्या धावपळीच्या युगात देखील ते स्वत:च्या आरोग्याची  काळजा घेण्यात ते दोन पावले इतरांपेक्षा पुढेच असतात.

ठळक मुद्देरायगड, नाशिक, सांगली, भंडाऱ्यातील जलसाठाही प्रदुषितकेंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालातून माहिती समोरराज्यात आढळलेल्या १ हजार ९६९ प्रदुषित नमुन्यांपैकी निम्मे जिल्ह्यातील विषाणू, सूक्ष्म जंतू, आदिजीव (प्रोटोझेआ), एकपेशीय जीव आणि जंतूद्वारे अनेक रोग

विशाल शिर्के पुणे :  चांगला पाऊस आणि वातावरणाचे वरदान लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील भूजल साठे आजाराला निमंत्रण देणाऱ्या फीकल कोलिफॉर्म सारख्या जीवाणूंनी बाधित असल्याची माहिती हाती आली आहे. राज्यात आढळलेल्या १ हजार ९६९ प्रदुषित नमुन्यांपैकी निम्मे जिल्ह्यातील आहेत. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने जाहीर केलेल्या राज्य जल गुणवत्ता अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा खूपच चांगली असल्याचे दिसत आहे. आर्सेनिक सारख्या विषारी घटकांचे प्रमाण राज्यात शून्य आहे. आयर्न, फ्लोराईड, नायट्रेट यांसारख्या घटकांचे प्रमाण देखील तुनलेने कमी आहे. मात्र, जनावरांचा मैलापाणी आणि अस्वच्छतेमुळे पसरणाºया कोलिफॉर्म सारख्या जीवाणूचे अस्तित्व राज्यातील काही जिल्ह्यांत दिसून येत आहे. राज्यातील २ लाख ६५ हजार ९५६ भूजल साठ्यांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्या पैकी २ लाख ५८ हजार नमुन्यांमधे कोणतीही दुषके आढळली नाहीत. सुमारे पाच हजारांहून अधिक नमुन्यांमध्ये आयर्न, फ्लोराईड, नायट्रेट आणि मानवी आरोग्यास बाधक ठरणाऱ्या जीवाणूंची उपस्थिती आढळून आली. त्यातही नागपूरमध्ये आयर्न, परभणीमध्ये नायट्रेट आणि पुणे जिल्ह्यातील भूजलसाठ्यात जीवाणूंचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. पुण्यामधील भूजल साठ्यामध्ये नायट्रेट, क्षारता, फ्लोराईड यांसारखे घटक अजिबात उपस्थित नाहीत. त्यातही दुषित नमुन्यांपैकी तब्बल ७० टक्के फीकल कोलिफॉर्मचे नमुने एकट्या दौंड तालुक्यातील आहेत.   -पाण्यातील सूक्ष्म जंतूंमुळे पसरणारे आजारविषाणू, सूक्ष्म जंतू, आदिजीव (प्रोटोझेआ), एकपेशीय जीव आणि जंतूद्वारे अनेक रोग होतात. मानवी मलमूत्रामुळे दुषित झालेल्या पाण्यामुळे देखील अनेक रोगांना निमंत्रण मिळते. पटकी (कॉलरा), विषमज्वर (टायफाईड), कावीळ (हेपटायटीस), लेप्टोस्पायरसीस असे अजार होतात. या शिवाय पाण्यातून अथवा पाण्याची कमतरता झाल्याने हगवण, आमांश, जठरदाह देखील होऊ शकतो. ईकोलिफॉर्म जंतू पाण्यात नसावेत. -अशी होते पाण्याची जैविक तपासणीपाण्यातील सूक्ष्म जंतूचे, कोलिफॉर्म व फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण तपासण्यासाठी एच. टू. एस. व्हायल ही पद्धत वापरली जाते. यामध्ये पाण्याचा नमुना एचटूएस व्हायलमध्ये घेऊन विशिष्ट खुणे पर्यंत भरला जातो. हा नमुना ३० ते ४८ तास ठेवतात. त्यानंतर नमुना काळा झाल्यास पाण्यात रोगकारक जंतू असल्याचे मानले जाते. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीHealthआरोग्य