शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

कोरोनासंबंधी काळजी, दक्षता ठीक ! पण स्वच्छतेसाठी झटणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचे काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:06 PM

सफाई कामगार मास्क, हॅन्डग्लोव्हज नसतानाही करीत आहे काम

ठळक मुद्देएखाद्या सफाई कामगाराला कोरोनाचा प्रादुर्भाव भविष्याकरिता प्रचंड हानिकारक

अतुल चिंचली - पुणे : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी प्रशासन शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी राहण्याचे आवाहन करीत आहे. परंतु घाणीच्या साम्राज्यात काम करीत असणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी माहिती सफाई कामगारांनी ‘लोकमत’ला दिली. कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शाळा, महाविद्यालये, मॉल, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद केली आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कोणालाही होत आहे. सफाई कामगार सतत घाणीत काम करीत असतात. कोरोनाकडे पाहता स्वच्छ राहण्याचे आवाहन केले जात आहे. जे ऑफिसमध्ये काम करीत आहेत. त्यांनाही मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. सफाई कामगार मास्क, हॅन्डग्लोव्हज नसतानाही काम करीत आहेत. महानगरपालिकेने त्यांना कुठल्याही प्रकारचं साहित्य दिलेले नाही. त्याचप्रमाणे कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबद्दल कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. बरेच सफाई कामगार झोपडपट्टीत राहणारे आहेत. घरी जाताना ते अनेक ओळखीच्या लोकांना भेटत असतात. त्यामुळे एखाद्या सफाई कामगाराला कोरोनाचा प्रादुर्भाव भविष्याकरिता प्रचंड हानिकारक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले..............भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत काम करतो. झाडून काढणे, कचऱ्याचे ढीग उचलणे अशी कामे करावी लागतात. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महानगरपालिकेकडून कुठलंही साहित्य दिले नाही. शिवाय आमची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. प्रशासनाने सफाई कामगारांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करावी; तसेच मास्क, हँडग्लोव्हज असे साहित्यही पुरवावे. - विशाल कांबळे, सफाई कामगारय्.............गेली कित्येक वर्षे प्रशासनाकडे आरोग्य, काम करताना लागणारे साहित्य याविषयी मागणी करीत आहोत. पण त्या पूर्ण केल्या जात नाहीत. आता ही कोरोना फारच गंभीर साथ आहे. यापासून लांब राहण्यासाठी स्वच्छ राहणे गरजेचे आहे. मी मंगळवार पेठमध्ये झाडून काढण्याचे काम करते. अशा वेळी आमच्याकडे सर्वात जास्त लक्ष दिले पाहिजे.   - आरती खरारे, सफाई कामगार.................

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीHealthआरोग्य