दौंडमध्ये १० ठिकाणी घरफोडी; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:27 IST2026-03-16T16:27:29+5:302026-03-16T16:27:46+5:30

सराईत गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दरोडा व आर्म अॅक्टचे १० गुन्हे दाखल आहेत.

Burglary at 10 places in Daund; Four people including the innkeeper arrested, property worth lakhs seized | दौंडमध्ये १० ठिकाणी घरफोडी; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

दौंडमध्ये १० ठिकाणी घरफोडी; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

केडगाव: दौंड तालुक्यातील वाखारी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा यवत पोलिसांनी छडा लावत सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली असून तब्बल १० घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दि. ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास वाखारी (ता. दौंड) येथे फिर्यादी यांच्या घराचा दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. किचनमधील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. याचवेळी सांवत सुभाष शेळके यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी रुकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण (रा. न्हावरा, ता. शिरूर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर महेश संभाजी भोसले (रा. गुंडेगाव, जि. अहिल्यानगर) व अमोल शास्त्री भोसले (रा. न्हावरा) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी यवत पोलीस ठाणे हद्दीत ६ व उरळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत ३ अशा एकूण १० घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. चोरीचा मुद्देमाल अहिल्यानगर येथील सराफ किरण विलास बु-हाडे याला विकल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.

मुख्य आरोपी रुकुल चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दरोडा व आर्म अॅक्टचे १० गुन्हे दाखल आहेत. यवत पोलिसांनी या फरार गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : दौंड: 10 चोरियों में चार गिरफ्तार, लाखों का माल बरामद

Web Summary : यवत पुलिस ने दौंड में दस चोरियों का पर्दाफाश किया, जिसमें एक अनुभवी अपराधी सहित चार लोगों को गिरफ्तार किया गया। लाखों रुपये के चोरी के सोने और नकदी बरामद किए गए। मुख्य आरोपी पर डकैती और शस्त्र अपराधों का इतिहास है।

Web Title : Daund: Four Arrested in 10 Burglaries, Stolen Goods Recovered

Web Summary : Yavat police cracked ten burglaries in Daund, arresting four, including a seasoned criminal. Stolen gold and cash, worth lakhs, were recovered. The main accused has a history of robbery and arms offenses.