शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जम्बो महापालिकेचा भार सोसवेना

By admin | Updated: June 2, 2014 00:34 IST

गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत १५०० सेवकांच्या भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. मात्र, राज्य शासनाच्या एका अध्यादेशाने महापालिकेचे क्षेत्र दुप्पट झाले.

पुणे : गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत १५०० सेवकांच्या भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. मात्र, राज्य शासनाच्या एका अध्यादेशाने महापालिकेचे क्षेत्र दुप्पट झाले. त्यामुळे सद्य:स्थितीतील मनुष्यबळावर अतिरिक्त ताण वाढणार असून, त्यासाठी ठेकेदारांवर कारभार विसंबून राहणार आहे. पुणे महापालिका हद्दीत १९९७ला ३८ गावांचा समावेश झाला. त्यानंतर १९९९ला पुन्हा १५ गावे अंशत: वगळण्यात आली. त्यानंतर उर्वरित समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा महापालिकेने २००५मध्ये राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला. तब्बल सात वर्षांनंतर शासनाने २३ गावांचा आराखडा अंशत: मंजूर केला. मात्र, अद्याप आराखड्यातील जैववैविध्य उद्यान (बीडीपी) प्रश्न प्रलंबित आहे. अगोदरच्या २३ गावांच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच राज्य शासनाने आणखी ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय २९ मे रोजी घेतला. पुण्याची महापालिका क्षेत्रफळाने मुंबईएवढी झाली आहे. मात्र, मुंबई महापालिकेत अभियंत्यांची संख्या २००० आहे, तर पुणे महापालिकेत ४५०इतकी नगण्य आहे. आणखी ५०० अभियंत्यांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी धूळ खात आहे. शिवाय, गेल्या तीन ते चार दशकांपासून महापालिकेच्या सेवेत असलेले १०० ते १५० सेवक दरमहा सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे उतरोत्तर महापालिकेचे मनुष्यबळ कमी होत असून, नवीन भरती नसल्याने कर्मचार्‍यांना नवीन गावांचा बोजा सहन करणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेत कर्मचार्‍यांविना ठेकेदारीला प्रोत्साहन मिळत आहे. (प्रतिनिधी)