शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या शौर्याला साजेसे स्मारक साकार करा - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:31 IST

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळाची विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा

कोरेगाव भीमा : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे राजांचे ऐतिहासिक संदर्भ, प्राचीन वस्तुरचना व आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून राजांचा शौर्याला, पराक्रमाला साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक साकारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर श्रीक्षेत्र वढू- तुळापूर ग्रामस्थांशीही संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

श्रीक्षेत्र तुळापूर येथे शिरूर-हवेली मतदारसंघातील महत्त्वपूर्ण अशा छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, वढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिवले, तुळापूरच्या सरपंच ॲड. गुंफा इंगळे, व वढू व तुळापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदींसह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळाची विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. विकासकामे करताना दगडी कातीव, कोरीव बांधकाम, मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधिस्थळ स्मारक वढू (बु.) विकास आराखड्याअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील एकूण २६४ कोटी रुपयाच्या कामाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शासनस्तरावर बैठक घेऊन त्वरित मंजुरी देण्यात येईल. या कामांचे सविस्तर आराखडे व अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याची कार्यवाही करावी असे सांगत नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच येथे जोडरस्ते व भीमा नदीवरील वढू खुर्द ते वढू बुद्रुकला जोडणाऱ्या तसेच आपटी-तुळापूरला जोडणाऱ्या दोन पुलांमुळे वढू-तुळापूरचा परिसराचा मोठा कायापालट हाेणार असल्याचे नमूद केले.

समाधिस्थळाचे काम लवकर सुरू करावे

वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील शंभूराजांच्या समाधिस्थळावरील विकास आराखड्यामधील कामे अद्याप सुरू झाली नसून ती जलदगतीने व गुणवत्तापूर्वक सुरू होऊन, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील आराध्य दैवताच्या या ऐतिहासिक समाधीस्थळाचे काम लवकरच आपल्याच काळात पूर्ण होईल असे सर्व शंभूभक्तांना वाटत असल्याचे वढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिवले यांनी सांगत पुण्यतिथी कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अथवा शासकीय निधीतून ५ लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

वढूत विद्यापीठ दर्जाचे शौर्यकला प्रशिक्षण केंद्र व्हावे

श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथील समाधी स्थळावर धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने ९ कोटी रुपयांचे तटबंदी, बुरुंज, सभागृह, मेघडंबरी बांधकाम केले आहे. या कामांना धक्का न लागता 'शहाजी ते महादजी' ही मराठा वीर पुरुषांची स्मारक रुपाने मालिका साकार व्हावी तसेच शिव शंभूची शौर्य कला प्रचलित व्हावी यासाठी विद्यापीठ दर्जाचे प्रशिक्षण केंद्र व्हावे अशी मागणी स्मृती समितीचे कार्यवाहक मिलिंद एकबोटे यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारVadhu Budrukवढू बुद्रुकMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज