शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सुटल्यावरच बीआरटीस गती

By admin | Updated: August 3, 2015 04:03 IST

संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यान सुमारे साडेसहा किलोमीटरच्या बीआरटी (बस रॅपिड ट्रान्सपोर्ट) मार्गाचे अंतर कापण्यासाठी बसला २० मिनिटांचा कालावधी लागत

येरवडा : संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यान सुमारे साडेसहा किलोमीटरच्या बीआरटी (बस रॅपिड ट्रान्सपोर्ट) मार्गाचे अंतर कापण्यासाठी बसला २० मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे बसमधून प्रवास केल्यानंतर समोर आले. सध्या या मार्गावर रिकाम्या बस फिरवून चाचणी घेण्यात येत आहे. प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर हा कालावधी वाढण्याचीही शक्यता आहे. या मार्गाची ५ आॅगस्टपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे.या बीआरटी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूकडील संपूर्ण रेलिंगची रंगरंगोटी व इतर किरकोळ कामे सध्या सुरू आहेत. या मार्गाची चाचणी घेण्यासाठी १ आॅगस्टपासून बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. संगमवाडी ते विश्रांतवाडीदरम्यान १० बस दिवसभर फेऱ्या मारून चाचणी घेत आहेत. यामध्ये बस प्रवासात येणाऱ्या अडचणी व बसस्थानकांचे स्वयंचलित दरवाजे बस थांबल्यावर उघडतात की नाही याची चाचपणी करून नोंद घेण्यात येत आहे.विश्रांतवाडीमध्ये बीआरटीच्या बस थांबण्यासाठी विमानतळ रस्त्यावर ‘टर्मिनल’ करण्यात आले आहे. संगमवाडीमध्ये मात्र असे टर्मिनल दिसले नाही. प्रवासादरम्यान पुढील स्थानक कोणते याची बसमध्ये यंत्राद्वारे आपोआप घोषणा होते. तसेच बसमध्ये बसवलेल्या ‘डिस्प्ले’वरही पुढच्या स्थानकाचे नाव येते. मात्र काही वेळा ही यंत्रणा काम करीत नसल्याचे दिसून आले. आंबेडकर सोसायटी बसथांब्याचा ‘बीआरटी सिग्नल’ बंद आहे. या ठिकाणी डेक्कन कॉलेज चौकाकडून आंबेडकर सोसायटीकडे जाताना एकाच वेळी डाव्या ‘लेन’मधील वाहने उजवीकडे वळतात, तर उजव्या लेनमधील बस सरळ जात असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. बसमधील चालक व वाहकांकडे बीआरटीविषयी चौकशी केली असता, त्यांनी समाधान व्यक्त करीत सध्यातरी काहीही अडचणी नसल्याचे सांगितले.