चारित्र्याच्या संशयावरून भावानेच केला चाकू भोसकून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:11 IST2025-11-21T12:10:47+5:302025-11-21T12:11:42+5:30
चुलत भावाचे आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आरोपीने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

चारित्र्याच्या संशयावरून भावानेच केला चाकू भोसकून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला
धनकवडी: चारित्र्याच्या संशयावरून चाकू ने भोसकून भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय आली आहे, खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून कात्रज-गुजरवाडी परिसरात टाकल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अजय पंडित, (वय २२ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक पंडित (वय ३५ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोघेही झारखंडचे रहिवासी असून काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी अजय पंडित बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. पोलिसांनी तपास सुरू करताच अनेक धागेदोरे हातात लागले. तीन दिवसांपासून गायब असलेल्या अजय पंडित याचा मृतदेह अखेर निंबाळकरवाडीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणात अजय पंडित यांचा चुलत भाऊ अशोक पंडित यानेच खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली. त्याने गुन्हा केलेले ठिकाण गुजरवाडी परिसरातील असल्याचे दाखवले. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला होता. अशोक पंडितच्या पत्नीचे अजय पंडितसोबत प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यातूनच हा खून घडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नेमका वाद कशावरून झाला याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृतदेह ससून रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.