शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात मावस भाऊ आणि बहिणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 16:43 IST

दोघे बहीण भाऊ शेजारी शेजारी राहत होते...

मंचर : आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मावस भाऊ आणि बहिणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.ही घटना मंगळवारी ( दि. १३ ) पहाटे घडली.या घटनेने खळबळ उडाली असुनआत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भागातील खडकी गावठाणानजीक स्मशानभुमीजवळ असणाऱ्या एका विहिरीत नात्याने मावस बहीण भाऊ असणाऱ्या अक्षय अशोक जाधव ( वय २४ ) आणि ऋतुजा उत्तम तट्टु (वय १९)  या दोघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याची घटना आज ( सकाळी उघडकीस आली.

    दोघे बहीण भाऊ शेजारी शेजारी राहत होते.मुलगा अक्षय याचे वडील मयत असून तो मूळचा राजूरी येथील आहे.आई माहेरी येवून राहत होती. खडकी गावातील ऋतुजा उत्तम तट्टु ही मुलगी मंगळवारी पहाटे ३ वाजता घरातुन बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडील उत्तम तट्टु यांनी मंचर पोलिसांना आज सकाळी दिली.त्यानंतर मंचर पोलिसांनी ऋतुजा तट्टु हिचा शोध सुरू केला. खडकी येथील पोलिस पाटील मंगल पोखरकर यांनी खडकी स्मशान भुमीजवळील धोंडिभाऊ हरिभाऊ पोखरकर यांच्या विहिरीत एक तरुण आणि तरुणीचा मृतदेह दिसत असल्याचे पोलिसांना कळविले. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे ,पोलिस कर्मचारी राजेंद्र हिले,विनोद गायकवाड,सुनिल शिंदे,दिनेश माताडे, गणेश तेली  यांनी घटनास्थळी जावुन विहिरीत पाहिले असता तेथे ओढणीने एकमेकांना बांधुन आत्महत्या केल्याचे दिसुन आले.

मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास भागवत यांनी दोघांचे शवविच्छेदन केले.मृतदेह नातेवाईक ताब्यात देण्यात आले आहेत. अक्षय जाधव आणि ऋतुजा तट्टु या दोघांनी नेमकी आत्महत्या का केली.याचा शोध मंचर पोलिस घेत आहे.पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले तपास सुरू केला आहे . उदया नातेवाईकांकडे चर्चा करणार आहे.दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :ambegaonआंबेगावDeathमृत्यू