माहेरकडून पैसे घेऊन ये; हुंड्यासाठी त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, सासरच्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 09:56 IST2025-12-06T09:56:01+5:302025-12-06T09:56:22+5:30
लग्नानंतर पतीने व सासूनकडून माहेरून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता

माहेरकडून पैसे घेऊन ये; हुंड्यासाठी त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, सासरच्यांवर गुन्हा दाखल
पुणे : माहेरूहून पैसे आणावेत या कारणासाठी विवाहितेला त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासूला अटक केली आहे.
मनीषा सिन वीर (३२, रा. लाडोबा वस्ती, पांडुरंग ट्रेडर्स, केसनंद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे तर रामचंद्र दिलीप बुरटे (३५) आणि सिमिती दिलीप बुरटे (५०, दोघेही रा. नवदुर्गा किरणा शॉपजवळ, लाडबा वस्ती, केसनंद) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहे. याबाबत विवाहितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२२ मनीषा यांचे लग्न रामचंद्र बरुटे यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर पतीने व सासूनकडून माहेरून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून विवाहितेने बुधवारी आत्महत्या केली.
तरुणाला बिअरच्या बाटलीने मारहाण; विमाननगरमधील घटना
दगड मारल्याच्या संशयातून तिघांनी एका तरुणाला बिअर बाटलीने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बुधवारी विमाननगर येथे घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शाहरूख फिरोज खान (२८, रा. रिअल इस्टेट एजंट, संजय पार्क, विमाननगर) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील शुभ गेट वे सोसायटी समोर होता. त्यावेळी तीन अनोखळी मुलांनी दगड मारल्याच्या संशयावरून त्याला बिअरच्या बाटलीने मारहाण करून जखमी करून पोबारा केला.