शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक फेल पीएमपीचा नेहरू रस्त्यावर थरार

By admin | Updated: October 30, 2015 00:30 IST

गुलटेकडीकडून लोहगावकडे जात असलेल्या पीएमपी बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास नाना

पुणे : गुलटेकडीकडून लोहगावकडे जात असलेल्या पीएमपी बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास नाना पेठेतील हॉटेल आईनासमोर घडली. चालकाने प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या आईना हॉटेलच्या दिशेने घेतली. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या वाहनांना धडकवत ही बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे आणि रस्त्यावरील वाहनचालकांचे प्राण वाचल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी हेल्प फाउंडेशनचे यासीन शेख यांनी दिली.गुलटेकडीकडून लोहगावच्या दिशेने पीएमपी बस जात होती. रामोशी गेट चौक ओलांडून ही बस नेहरू रस्त्याने पुणे स्टेशनच्या दिशेने जात होती. आईना हॉटेल चौकाच्या अलीकडेच या बसचे ब्रेक निकामी झाले. बसचा वेग अधिक असल्यामुळे चौकात असलेल्या वाहनांना तसेच वाहनचालकांना धडक बसण्याचा धोका होता. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत ही बस आईना हॉटेलच्या दिशेने घेतली. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना या बसची जोरात धडक बसली. परंतु त्यामुळे ही बस जागेवरच थांबली. बस बाजूला घेत असताना डाव्या बाजूच्या दिशेने आलेल्या मोटारीला बस घासली गेली आणि सायकलस्वाराला धडकली. यामध्ये मोटारचालक आणि सायकलस्वार किरकोळ जखमी झाले.सुदैवाने ज्या ठिकाणी बस थांबली, तेथेच महावितरणच्या असलेल्या डीपीला धडक बसली नाही. अपघातानंतर बघ्यांची एकच गर्दी घटनास्थळावर जमा झाली होती. हॉटेलचालकाने बसचालकाला बसमधून खाली उतरवले. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता. त्यांना पाणी देऊन जमा झालेल्या गर्दीला समजावले. यासीन शेख यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना खाली उतरवले. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही; तसेच जीवितहानी झाली नाही.