दुसऱ्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

By Admin | Updated: August 2, 2015 23:59 IST2015-08-02T23:59:00+5:302015-08-02T23:59:00+5:30

पुण्यातील हे पाच पर्यटक शनिवारी दुपारी कर्दे येथे आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते बीचवर फिरण्यासाठी गेले.

The body of another missing man was found | दुसऱ्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

दुसऱ्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

दापोली : कर्दे येथील समुद्रात बुडालेल्या पुणे येथील दोघा पर्यटकांपैकी बेपत्ता झालेल्या दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेहही रविवारी लाडघर समुद्रकिनारी सापडला. रवी पाटील (वय २३) असे त्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील हे पाच पर्यटक शनिवारी दुपारी कर्दे येथे आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते बीचवर फिरण्यासाठी गेले. समुद्रात पोहत असताना त्यातील अक्षय मोरे (२२) व रवी पाटील (२३) हे दोघेजण बुडाले. त्यातील अक्षयचा मृतदेह शनिवारीच सापडला होता, तर रवी पाटील बेपत्ता होता.शनिवारी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. रात्र झाल्यानंतर शोध थांबविण्यात आला. रविवारी सकाळी लाडघर येथील समुद्रात त्याचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)

Web Title: The body of another missing man was found