शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:18 IST

महाराणा प्रताप उद्यानाजवळ मास्क लावून आलेल्या तिघांकडून एका तरुणावर वार करत खून केल्याची घटना घडली आहे

पुणे: पूर्वी झालेल्या भांडणातून तिघांनी एका तरूणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास बाजीराव रस्त्यावर घडली. या हल्ल्यात मृत तरुणाचा मित्रही जखमी झाला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी फरार झालेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मयंक सोमदत्त खरारे (१७ रा. साने गुरुजीनगर, आंबीलओढा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर अभिजित संतोष इंगळे (१८, रा. दांडेकर पूल) असे हल्ल्यात जखमी झालेल्यांचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित हे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळ थांबले होते. यावेळी तिघांंनी मयंकवर कोयत्याने वार केले. यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या अभिजितवरही हल्लेखोरांनी वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या मयंक व अभिजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मयंकचा मृत्यू झाला असून अभिजीतवर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत असून हा हल्ला पूर्वी झालेल्या भांडणातून केल्याची प्राथमिक माहिती हाती आल्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांनी दिली.

पुण्यात दिवसाढवळ्या खून, तोडफोडच्या घटना वाढू लागल्या आहेत. मागील आठवड्यात गणेश काळेचा टोळीयुद्धातून भरदिवसा खून करण्यात आला होता. हा खून कोंढवा भागात झाला होता. त्यानंतर आठवडाभरातच शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्याला खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आताच्या गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे अशा घटनांमधून दिसू लागले आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Youth Murdered in Broad Daylight on Bajirao Road

Web Summary : In Pune, a young man, Mayank Kharare, was brutally murdered near Maharana Pratap Garden. Three masked assailants attacked him with sharp weapons, resulting in his immediate death. This incident follows a recent gang-related killing, raising public safety concerns.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूSocialसामाजिकbikeबाईक