शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:36 IST

BJP Pune PMC Election: बंडखोरी टाळण्यासाठी मुंबई, पुण्यासह इतरत्र ही क्लुप्ती भाजपाने वापरलेली आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कोण असतील हे कळण्यासाठी उद्याची दुपार उलटण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने बंडखोरीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. अशातच भाजपाने पुण्यात उमेदवार यादी काही केल्या जाहीर केलेली नाही, परंतू सकाळीच उमेदवारांना अर्ज भरण्याचा मेसेज पोहोचविण्यात आला आहे. यामुळे तयारीत असलेल्या सुमारे ८० उमेदवारांनी आज अर्ज भरण्यासाठी महापालिकेची कार्यालये गाठण्यास सुरुवात केली आहे. 

महत्वाचे म्हणजे या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आलेले असले तरीही काहींना एबी फॉर्म मात्र देण्यात आलेला नाहीय, असे समजते आहे. तो उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत देण्यात येणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी मुंबई, पुण्यासह इतरत्र ही क्लुप्ती भाजपाने वापरलेली आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कोण असतील हे कळण्यासाठी उद्याची दुपार उलटण्याची शक्यता आहे. असे असले तरीही आपल्या जागी कोणाला उमेदवारी मिळाली, याची कुणकुण इतर इच्छुकांना लागलेली आहे. 

एबी फॉर्म का लागणार नाही...

निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की एखाद्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज भरताना पक्षाचा बी फॉर्म सोबत जोडण्याची गरज नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत बी फॉर्म हा द्यावाच लागतो. जो उमेदवार पक्षाचा बी फॉर्म घेतो, तोच अधिकृत उमेदवार मानला जातो आणि त्यालाच पक्षाचे चिन्ह दिले जाते.

वेळेवर बी फॉर्म देण्याची शक्कलअगदी वेळेवर बी फॉर्म देण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे, त्यांच्यापैकी जे तगडे उमेदवार आहेत ते लगेच इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवू शकतात. तशी संधी त्यांना मिळू नये म्हणूनही वेळेवर बी फॉर्म देण्याची शक्कल लढविण्यात आली आहे. भाजपने एकाही महापालिकेसाठी अशी यादी जाहीर केलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी हा पवित्रा घेण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's silent strategy in Pune: Candidates informed, AB forms delayed.

Web Summary : To prevent rebellion in Pune's municipal elections, BJP informed candidates to file nominations but delayed AB forms. Official candidates will be clear tomorrow. This tactic aims to avoid strong contenders switching parties.
टॅग्स :PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६