लॉकडाऊनला भाजपचा विरोध नाही, लॉकडाऊनचे पालन करू - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:12 AM2021-04-22T04:12:05+5:302021-04-22T04:12:05+5:30

पुणे : कोरोनाची सध्याची परिस्थितीची युद्धापेक्षाही अधिक भयानक आहे़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता सर्वपक्षीय नेत्यांची मदत ...

BJP is not against lockdown, let's follow lockdown - Chandrakant Patil | लॉकडाऊनला भाजपचा विरोध नाही, लॉकडाऊनचे पालन करू - चंद्रकांत पाटील

लॉकडाऊनला भाजपचा विरोध नाही, लॉकडाऊनचे पालन करू - चंद्रकांत पाटील

Next

पुणे : कोरोनाची सध्याची परिस्थितीची युद्धापेक्षाही अधिक भयानक आहे़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता सर्वपक्षीय नेत्यांची मदत घ्यावी़ भाजपचा लॉकडाऊन करण्यास कधीही विरोध नव्हता. आम्ही लॉकडाऊनचे पालनच करू़ केवळ लॉकडाऊनमुळे जे समाजातील बलुतेदार घटक घरात बसणार आहेत, त्यांच्या पोटाचा विचार केला जावा एवढीच आमची मागणी आहे़, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले़

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रुग्णालयांतील खाटा, आॅक्सिजन खाटा, रेमडेसिविर आणि लसीकरणाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी भाजपने तयार केलेल्या ‘बीजेपी पुणे डॅशबोर्डाचे’ अनावरण पाटील यांच्या हस्ते बुधवारी झाले. भाजपच्या पुणे शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्य सरकारने जर लॉकडाऊनची घोषणा केली, तर आम्ही त्याचे पालनच करू, कारण आम्ही कायदा पाळणारे आहोत़ भाजपचा लॉकडाऊनला विरोध नव्हता, लॉकडाऊन करण्यापूर्वी केवळ समाजातील बलुतेदारांचा विचार व्हावा़, अशी आमची भूमिका होती. नागरिक पोट-पाण्यासाठी बाहेर पडतात, त्याचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र, तुम्ही काही म्हणा आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही करू, अशा पद्धतीने सरकार वागत असल्याचेही ते म्हणाले़

चौकट

मुख्यमंत्री, शरद पवार, नितीन गडकरी आणि राज ठाकरेंनीही करावेत फोन

कोरोनाची दुसरी लाट भयानक असून, ती युध्दापेक्षा कमी नसून आज परिस्थिती हाताबाहेर जात आहे़ त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाला फोन केल्यावर कोणतीही गोष्ट उपलब्ध होते, हे माहीत आहे, त्यांची मदत घ्यावी. शरद पवार आजारी असले तरी त्यांना घरून फोन करायला सांगावेत़. याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबईत बोलावून त्यांना विविध घटकांना फोन करायला सांगावेत. अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या स्टाईलने फोन करायला लावावे आणि या परिस्थितीवर मात करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले़

------------------------------

Web Title: BJP is not against lockdown, let's follow lockdown - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.