शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडली पुण्यातील पक्षी-प्राणी तपासणी प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST

राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मृत पक्षी व प्राण्यांच्या तपासणीसाठी अत्यावश्यक असलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा पुण्यात बांधण्याचा प्रस्ताव ...

राजू इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मृत पक्षी व प्राण्यांच्या तपासणीसाठी अत्यावश्यक असलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा पुण्यात बांधण्याचा प्रस्ताव निधीअभावी सरकारकडे प्रलंबित आहे. सध्या बर्ड फ्लूचा आजार पक्ष्यांमध्ये वेगाने फैलावत असल्याने अशा प्रयोगशाळेची निकड भासू लागली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

इमारतीसाठी ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सरकारने या प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे, मात्र निधीची तरतूद केलेली नाही, त्यामुळे मंजूर होऊनही हा प्रस्ताव पुढे जायला तयार नाही. राज्याच्या पशुसंवर्धन विभागानेच हा प्रस्ताव सरकारला दिला होता. पक्षी व प्राणी एखाद्या साथीच्या आजाराने अचानक मोठ्या संख्येने दगावू लागले की, त्यांच्या मृत शरीराची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येते. साथीचा आजार असेल तर तो नव्याने अन्य पक्ष्यांमध्ये फैलावू नये, तसेच मानवाला त्याचा धोका उत्पन्न होऊ नये यासाठी अशी तपासणी आवश्यक असते. सध्या देशात अशी एकमेव प्रयोगशाळा भोपाळमध्ये आहे.

एकच प्रयोगशाळा असल्याने नमुने तपासणीसाठी वेळ लागून त्याचे निष्कर्ष त्वरित मिळत नाहीत, त्यामुळे नव्या प्रयोगशाळा गरजेचे वाटल्याने राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने हा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. या प्रयोगशाळेचे ४ स्तर आहेत. (बीएसएल, बायो सेफ्टी लेवल,जैव सुरक्षा स्तर) त्यातील पहिल्या दोन स्तराच्या प्रयोगशाळा देशात आणखी चार राज्यांमध्ये सुरू केल्या. त्यात पशुसंवर्धन विभागाच्या पुणे मुख्यालयातील प्रयोगशाळेचा समावेश आहे.

मात्र, वर्षभरापूर्वी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने तिसऱ्या स्तरावरची प्रयोगशाळा पुण्यात सुरू करावी, असा प्रस्ताव राज्याला दिला होता. त्याला मंजुरी मिळाली, मात्र तो निधीच्या फेऱ्यात अडकला आहे. आता राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव होत असल्याने तपासणीचे निष्कर्ष त्वरित मिळावेत, यासाठी अशी प्रयोगशाळा राज्यातही असणे अत्यावश्यक असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे मत आहे.

पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले की, चौथ्या स्तरावरची प्रयोगशाळा भोपाळमध्येच असेल. तिथे मृत पक्षी, प्राणी यांचे शवविच्छेदन करून तपासणी केली जाते, मात्र तिसऱ्या स्तरापर्यंतच्या तपासणीमधून त्वरेने काही माहिती मिळते व त्यापासून काळजी घेणे, साथ नियंत्रणात आणणे लगेच करता येते. त्यासाठीच अशा प्रयोगशाळेची गरज आहे.

--

पाठपुरावा सुरू

आमच्या विभागाच्या वतीने आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आयुक्त कार्यालयात या प्रयोगशाळेसाठी जागा असल्याने जागेची अडचण नसल्याचे राज्य सरकारला कळवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

- सचिंद्र प्रताप सिंग, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग.