Bhimashankar Temple Closed: भीमाशंकर मंदिर आणखी एक महिना बंद; परिसरात कामे सुरू असल्याने निर्णय, थेट जूनच्या सुरुवातीला दर्शन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:16 IST2026-04-08T10:13:22+5:302026-04-08T10:16:47+5:30

Bhimashankar Temple Closed जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याने कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंदिर आता ३१ मेपर्यंत बंद राहणार आहे.

Bhimashankar Temple to remain closed for another month Decision taken as work is going on in the area, darshan will be done directly in early June | Bhimashankar Temple Closed: भीमाशंकर मंदिर आणखी एक महिना बंद; परिसरात कामे सुरू असल्याने निर्णय, थेट जूनच्या सुरुवातीला दर्शन होणार

Bhimashankar Temple Closed: भीमाशंकर मंदिर आणखी एक महिना बंद; परिसरात कामे सुरू असल्याने निर्णय, थेट जूनच्या सुरुवातीला दर्शन होणार

पुणे: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण या बाबी विचारात घेऊन मंदिर व परिसराची कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भीमाशंकरमंदिर भाविकांना दर्शनाकरिता ३१ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिराचे काम सुरू झाल्यापासून ९ जानेवारी ते ९ एप्रिल असे तीन महिने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विकासकामे अजूनही सुरू असल्याने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी आणि त्यासाठी आवश्यक सुविधा उभारणीसाठी मंदिराची विकासकामे सुरू आहेत. बांधकाम सुरू असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. ही कामे सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ९ जानेवारी ते ९ एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सभामंडपाचे सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असून घुमटाचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या पायरीमार्गाचे काम प्रगतीत असून प्रवेशमार्ग बंद आहे.

पावसाळ्यात येथे पावसाचे प्रमाण जास्त असते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंदिर आता ३१ मेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे सद्यस्थितीत विकासकामांना गती देण्यात आली आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे डुडी यांनी दिली आहे.

Web Title : भीमाशंकर मंदिर बंद: जून की शुरुआत तक दर्शन नहीं

Web Summary : कुंभ मेले की तैयारी और मानसून के कारण भीमाशंकर मंदिर 31 मई तक बंद रहेगा। भक्तों की सुरक्षा और आवश्यक बुनियादी ढांचे के उन्नयन को सुनिश्चित करने के लिए यह निर्णय लिया गया है, जिसमें सभामंडप और मार्ग शामिल हैं।

Web Title : Bhimashankar Temple Closure Extended: No Darshan Until Early June

Web Summary : Bhimashankar Temple will remain closed until May 31st due to ongoing development work for the upcoming Kumbh Mela and monsoon preparations. The closure ensures devotee safety and timely completion of essential infrastructure upgrades, including the assembly hall and pathway.