शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब भोईर, नढे निलंबित

By admin | Updated: February 14, 2015 03:02 IST

पक्षशिस्तीचा भंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर व विनोद नढे यांना शुक्रवारी

पिंपरी : पक्षशिस्तीचा भंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर व विनोद नढे यांना शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने पक्षातून निलंबीत केले. प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. भोईर हे शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, तर नढे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून शहर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. त्याचे पडसाद पक्ष संघटनेवर उमटले होते. महापालिका गटनेता म्हणून कैलास कदम यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली. मात्र, ते विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करतील, म्हणून त्यांच्या निवडीलाच नढे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. तसेच कदम व प्रभारी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या कारभाराविषयी पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रारींना सुरूवात केली.यामध्ये नढे व भोईर यांच्यासह राहुल भोसले, गणेश लोंढे, आरती चौंधे, गीता मंचरकर, सविता आसवानी, विमल काळे, शकुंतला बनसोडे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या साऱ्यांनी शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष साठे हे जुन्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यांच्याबरोबर काम करणे कठीण झाले आहे. ते अध्यक्ष आहेत, तोपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या. ही परिस्थिती पक्षहिताला बाधा ठरणारी असल्याने पक्षश्रेष्ठींनी कारवाईचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)