भांबोलीत भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:10 IST2021-01-21T04:10:53+5:302021-01-21T04:10:53+5:30

बनाराम रामराव वणवे (वय ३२, सध्या रा. भांबोली, ता. खेड, मूळ रा. राणीव्हरा, भादली, ता. माजलगाव, जि. बीड) असे ...

In Bhamboli, a two-wheeler was crushed by a speeding vehicle | भांबोलीत भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

भांबोलीत भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

बनाराम रामराव वणवे (वय ३२, सध्या रा. भांबोली, ता. खेड, मूळ रा. राणीव्हरा, भादली, ता. माजलगाव, जि. बीड) असे या अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बनाराम यांचा चुलत मेहुणा अशोक बाबू दराडे (वय ३४, सध्या रा. साई समृद्धी बिल्डिंग, आंबेठाण चौक, चाकण, बीड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. येथील पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बनाराम हे वासुली फाटा येथे कंपनीत कामाला होते. मंगळवारी (दि.१९) रात्री साडेअकराच्या दरम्यान ते आपल्या ताब्यातील मोटार सायकल दुचाकी गाडी (एमएच १४, ईएस ७१६४) घेवून चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ते भांबोली रस्त्याने घरी जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोराची ठोस बसून झालेल्या विचित्र अपघातात बनाराम हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता रातोरात वाहनासह गायब झाला आहे.

चाकण पोलिसांनी याप्रकरणी सबंधित वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In Bhamboli, a two-wheeler was crushed by a speeding vehicle