शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडामालकांचे आळंदीत ‘एल्गार’

By admin | Updated: March 14, 2015 06:15 IST

अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला .

शेलपिंपळगाव : अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला . शर्यतीवरी बंदी उठविण्यासाठी बैलगाडामालक व गाडाशौकिनानी तीर्थक्षेत्र आळंदी येथे एकदिवसीय सामूहिक उपोषण केले. महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपोषणासाठी पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, राजगड, अलिबाग, मुरबाड आदी ठिकाणांहून बैलगाडामालक आळंदीत आले होते. शुक्रवारी पहाटे श्रीज्ञानेश्वर माउलींच्या समाधीला अभिषेक घालण्यात आला. समाधीचे दर्शन घेऊन सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, आमदार महेश लांडगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. ‘बंदी’मुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांचे महत्त्व घटत चालले असून, शर्यतींच्या बैलांची किंमतही कमी होत आहे. विविध देव-देवतांच्या उत्सवाच्या निमित्त आयोजित या शर्यतींवर अवलंबून असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय डबघाईला आले आहेत, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. ‘बैलगाडा शर्यत बंदी’च्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कायद्यात बदल करून शर्यती सुरू करू, असे सूतोवाच केले होते. मात्र, याला वर्ष उलटून गेले तरीही ठोस निर्णय घेतला नसल्याने गाडामालकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदी, चाकण पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पसायदानाने लाक्षणिक सामूहिक उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)