शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याबाबत योग्य काळजी घ्या

By admin | Updated: June 30, 2015 23:07 IST

पुरंदरमध्ये मागील आठवड्यात पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा आहे. पावसामुळे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्ध करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा

सासवड : पुरंदरमध्ये मागील आठवड्यात पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा आहे. पावसामुळे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्ध करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा, ज्या विहिरींचे पाणी घ्यावयाचे आहे त्या विहिरीत औषधे टाकण्यात यावीत, आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा ठेवावा तसेच आरोग्य पथके तयार करावीत, पुरवठा विभागाने दर वर्षीप्रमाणे गॅस व रॉकेल पुरवठा करावा, विद्युत वितरण कंपनीने उघड्या फ्युजबॉक्सची दुरुस्ती करावी, पोलिसांनी वाहतूक व्यवस्था योग्य ठेवावी, त्याचे नियोजन करावे यांसारख्या सूचना प्रशासनाने पालखीसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १२ जुलै रोजी पुरंदर तालुक्यात येत आहे. हा सोहळा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असणार आहे.याबरोबरच जेजुरी, वाल्हे आदी ठिकाणीही पालखीचा मुक्काम असणार आहे. या सोहळ्यासाठी तालुक्यात योग्य व्यवस्था ठेवण्याबाबत पुरंदर -दौंडचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली सासवड तहसील कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, सासवड-जेजुरी नगरपालिका, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, महावितरण, एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, तहसीलदार संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)