शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत कृत्रिम पाणीटंचाई!

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे.

बारामती : शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तब्बल ८ ते ९ महिन्यांनी जाग आली आहे. आता त्यासाठी तलावातील पाण्याचा उपसा केला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली. रविवारपासून नगरपालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे या कृत्रिम पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जावे लागले आहे. साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी मातीचे साठवण तलाव होते. त्यानंतर सिमेंट-काँक्रीटचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२८ दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता या तलावात आहे. या तलावात पाणी साठविल्यानंतर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साधारणत: मे २०१४ पासून गळतीचे प्रमाण वाढले. दररोज २५ ते ३० लाख लिटर पाणी साठवण तलावातून गळतीच्या रूपाने बाहेर पडत होते. संभाव्य पाणीटंचाईला तोंड देणे भाग पडू नये, यासाठी नगरपालिकेने ४ पंप लावून ज्या बाजूने पाणी साठवण तलावातून बाहेर पडत आहे. ते उचलून परत तलावात सोडले. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातील पाणीटंचाई समस्या दूर झाली. यावर कायम स्वरुपी उपाययोजना करावी, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये तलावातील साठवलेले पाणी अक्षरश: गटाराद्वारे सोडून देण्यात आले. हे पाणी साठवून ठेवण्याचीदेखील तसदी घेतली नाही. गळती शोधण्यासाठी प्राधिकरणाने तलाव रिकामा करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तलाव रिकामा करण्यात आला. नगरपालिकेने केलेल्या तक्रारीनंतर जीवन प्राधिकरणाचे अधिकारी फक्त पाहणी करून जात होते. हा तलाव रिकामा केल्यामुळे रविवारपासून पाणीटंचाईचा सामना बारामतीकरांना करावा लागला. त्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सुदैवाने सोमवारी साखर कारखान्यांसाठी आवर्तन देण्यात आले होते. ते पाणी पुन्हा जुन्या खोदलेल्या साठवण तलावात साठवण्यात आले. त्यामुळे प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचे संकट टळले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)गळतीची दुरुस्ती करण्यासाठी तलाव रिकामा करून दिला आहे. साधारणत: फेब्रुवारी महिनाअखेर काम पूर्ण होईल, असे एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या जुना माती बंधाऱ्याच्या सिमेंट-क्राँक्रिटीकरणाचे काम थांबवून त्यामध्ये पाणी साठविण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हे काम करण्यात येणार आहे. नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारे या कामासाठी खर्च करण्यात येणार नाही. - सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष