बांगरवाडी होणार बारमाही बागायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:23+5:302021-02-05T05:04:23+5:30

जलसंधारण विभागाने केले सर्वेक्षण बेल्हा : बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे नुकताच तीन सिमेंट बंधाऱ्यांचा सर्व्हे जिल्हा जलसंधारण अधिकारी उमेश ...

Bangarwadi will be a perennial horticulture | बांगरवाडी होणार बारमाही बागायती

बांगरवाडी होणार बारमाही बागायती

जलसंधारण विभागाने केले सर्वेक्षण

बेल्हा : बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे नुकताच तीन सिमेंट बंधाऱ्यांचा सर्व्हे जिल्हा जलसंधारण अधिकारी उमेश बागल व टीमने केला. याआधी दोन बंधाऱ्यांचे अनुदान मंजूर असून आता गावात हे पाच नवीन सिमेंट बंधारे होणार आहेत.

आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या प्रयत्नातून तसेच गावचे सरपंच जालिंदर बांगर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गावाला एकूण पाच बंधारे मिळणार आहेत. नवीन बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी जिरले जाऊन विहिरींची, कूपनलिकेची पाण्याची पातळी वाढणार आहे. तसेच बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग करून चांगले पीक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

गावात चांगला पाऊस झाला, परंतु गावात बंधारे कमी असल्याने पावसाचे पाणी साठवता व अडवता आले नाही. या गावात मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा जाणवतो. या नवीन बंधाऱ्यांमुळे पावसाचं पाणी जिरलं जाऊन विहिरींची, कूपनलिकेची पाण्याची पातळी वाढणार आहे. तसेच बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग करून चांगले पीक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या बंधाऱ्यांचे सर्वेक्षण झाल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, जलसंधारण अधिकारी उमेश बागल, वासुदेव गावंडे, ज्ञानेश्वर खंदारकर, सरपंच जालिंदर बांगर, प्रदिप पिंगट, बाळशिराम बांगर, मंगेश बांगर, राजू बिचारे, आनंद बांगर, गणपत कदम, तात्या विचारे, सखाराम बांगर, राजेंद्र बांगर,अंकुश घोलप, तुळशीराम बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार

" जलसंधारण विभागाने पाहणी केलेल्या तीन नवीन सिमेंट बंधाऱ्यांची मार्चअखेरपर्यंत मंजुरी मिळेल. याआधी चोंडी व पदई येथील दोन सिमेंट बंधाऱ्यांचे एकूण ७० लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच सर्व कामे सुरू होणार आहेत. यामुळे गावातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून गाव बारमाही बागायती होणार आहे.

बांगरवाडी (ता. जुन्नर) बंधाऱ्यांचे सर्वेक्षण करताना जलसंधारण विभागाचे अधिकारी व गावचे ग्रामस्थ.

Web Title: Bangarwadi will be a perennial horticulture