शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाचे आमिष! आसामच्या तरुणीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाखात विक्री, पोलिसांनी केली सुटका

By नितीश गोवंडे | Updated: April 25, 2025 17:56 IST

आसामच्या तरुणीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता, तिला ६ वर्षाची मुलगी आहे, नवऱ्याला दारूचे व्यसन असून तो तिला त्रास देत होता

पुणे : विवाहाच्या आमिषाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आसाममधील तरुणीची पाच लाख रुपयात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अनाेळखी पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम (रा. आसाम), पापा शेख, अधुरा शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ), तसेच एका अनोळखी डीबीवाला (पोलिस कर्मचारी) या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शफीऊल मूळचा आसाममधील आहे. त्याने जानेवारी महिन्यात विवाहाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला आसाममधून पळवून आणले. त्याने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात पाच लाख रुपयात तरुणीची विक्री केली. तरुणीला धमकावून दलाल पापा शेख, अधुरा कामली यांनी तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले. आरोपींच्या ओळखीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. गेले चार महिने हा प्रकार सुरू होता. पीडित तरुणीने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजित जाधव पुढील तपास करत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे गुन्हा दाखल

परिसरातील दत्त मंदिराजवळ पीडितेला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले. पीडितेने तिच्यासोबत घडलेली घटना त्यांना सांगत मदत करण्याची विनंती केली. या सामाजिक कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन तिची कुंटणखान्यातून सुटका केली. कुंटणखाना चालक महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून आणले पुण्यात..

पीडिता मूळची आसाम येथे राहणारी असून तिचा २०१८ मध्ये विवाह झाला आहे. तिला ६ वर्षाची मुलगी आहे. तिच्या नवऱ्याचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्याला दारूचे व्यसन असून तो पीडितेला त्रास देत होता. भाजीच्या गाड्यावर ती असताना शफीऊल तेथे आला. त्याने तुला मुलीसह पुण्याला घेऊन जातो. कामाला लावतो, तेथे तुझ्याशी लग्न करतो, असे खोटे सांगून, विमानाने पुण्याला आणले. त्यानंतर त्याने पापा शेख याला तिला ५ लाख रुपयांना विकले. पापा शेख याने तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायाला लावले. डीबीवाल्या पोलिसांनी (डिटेक्शन ब्रांच) तिला मदत करायची सोडून तिच्याबरोबर या पोलिसाने वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

‘तो’ डीबीवाला कोण..?

पीडितेने दिलेल्या फिर्यादीत पोलिसाने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांना ‘तो’ डीबीवाला कोण याचा शोध लागलेला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी तपासात निष्पन्न होईल असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी वरिष्ठ पोलिस मुद्दाम संबंधित डीबीवाल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ‘तो’ डीबीवाला कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

टॅग्स :Puneपुणेbudhwar pethबुधवार पेठProstitutionवेश्याव्यवसायWomenमहिलाAssamआसामfaraskhana policeफरासखाना पोलीस