शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मृण्यमी गोंधळेकर करणार मतदानासाठी जागृती

By admin | Updated: September 15, 2016 01:31 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मतदार जागृती अभियानासाठी नृत्यांगना मृण्मयी गोंधळेकर हिची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मतदार जागृती अभियानासाठी नृत्यांगना मृण्मयी गोंधळेकर हिची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. कोणताही आर्थिक मोबदला न घेता मृण्मयी मतदान जनजागृती करणार आहे. मी मतदान करणार असून, तुम्हीही मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजवा, असे आवाहन तिने केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ रोजी होणार असून, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार जागृती अभियान राबविण्याचे ठरविले आहे. तरुणांच्या अधिकाधिक मतदान नोंदणीवर भर दिला जाणार आहे. तरुणांची टक्केवारी वाढावी, यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदारनोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. महापालिका निवडणुकीत मतदान करण्यासाठी सप्टेंबर आणि आॅक्टोबर या महिन्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरली जाते. निवडणूक आयोगाने १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत विधानसभा मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. नृत्याच्या विविध स्पर्धांमधून यश मिळविणारी आणि सध्या विविध चित्रपटांतून झळकणारी पिंपरी-चिंचवडची नृत्यांगना मृण्मयी गोंधळेकर या वर्षी मतदार जागृतीचे काम करणार आहे. सामाजिक जाणीव ठेवून यासाठी तिने कोणतेही मानधन घेतलेले नाही. दवंडीही पिटणार मतदारनोंदणी अभियानाविषयी प्रत्येक प्रभागात विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. जनजागृती वाढावी, या उद्देशाने प्रभागा-प्रभागांत दवंडी पिटली जाणार आहे. तसेच, चित्ररथ फिरवून ध्वनिक्षेपकाद्वारे अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही अभियानात सहभाग वाढविण्यात येणार आहे. पीएमपी बसमध्ये ध्वनिफितीद्वारे प्रचार केला जाणार आहे.चित्रपटगृह, रेडिओ, सोशल मीडियामार्फतही जनजागृती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे, असे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या विषयी मृण्मयी गोंधळेकर म्हणाली, ‘‘देशातील प्रत्येक नागरिकाचे मत हे अमूल्य असून, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवायला हवा. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदारनोंदणी अभियानात तरुणांनीही सहभाग घ्यायला हवा. महापालिका निवडणुकीतील मतदानासाठी मीही नावनोंदणी केली आहे.’’ (प्रतिनिधी)आर्चीच्या आवाजात मतदार जागृतीसैराटमधून एका रात्रीत स्टार झालेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरू मतदार नोंदणी अभियानात सहभागी होणार आहे. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू’ असे सांगून मतदारजागृती करणार आहे. तिच्या आवाजाची ध्वनिफीत ऐकविली जाणार आहे. निवडणुका आल्या, की निवडणूक प्रशासनासमोर मतदारांचे यादीत नावनोंदणी करणे, मतदार ओळखपत्र तयार करून घेणे, तसेच त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे मोठे आव्हान असते. त्यामुळेच हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अठरा महाविद्यालये, मुख्य चौक, गल्लोगल्ली ऐकायला मिळणार आहे. मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आर्चीच्या आवाजाच्या लकबीची साडेचार मिनिटांची ध्वनिफीत रेकॉर्ड केली आहे. यासाठी शुभांगी शिंदे यांनी लेखन करून आवाज दिला आहे.