जागोजागी उभी बेवारस वाहने

By Admin | Updated: May 9, 2017 03:59 IST2017-05-09T03:59:15+5:302017-05-09T03:59:15+5:30

पोलीस चौकीच्या हद्दीत सत्यपुरम ते मंतरवाडी चौकापर्यंत जागोजागी बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने वाहतुकीस

Awakening up and running unemployed vehicles | जागोजागी उभी बेवारस वाहने

जागोजागी उभी बेवारस वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क
फुरसुंगी : पोलीस चौकीच्या हद्दीत सत्यपुरम ते मंतरवाडी चौकापर्यंत जागोजागी बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने वाहतुकीस अडथळा व अपघातास निमंत्रण तर देतातच मात्र रात्रीच्या वेळेला या बेवारस वाहनांमध्ये अनेक अनैतिक कृत्ये होवू शकतात. यातून एखादी भीषण दुर्घटना होण्याचा धोका संभवत असूनही पोलीस प्रशासन मात्र कोणतीच कारवाई करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यावरील बेवारस वाहनांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
भेकराईनगर पोलीस चौकीच्या हद्दीत हडपसर-सासवड मार्गावर सत्यपुरम, भेकराईनगर बसस्थानक, गंगानगर, कात्रज बाह्यवळण मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून ट्रक, कार, दुचाकी व इतर वाहने बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला धूळखात पडुन आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा येतच आहे. मात्र भीषण अपघात होण्याचा धोका संभवतो. तसेच रात्रीच्यावेळेला या वाहनांमध्ये अनेक बेकायदेशीर व अनैतिक कृत्ये होण्याचा धोका संभवतो.

Web Title: Awakening up and running unemployed vehicles