शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

'भारतीय वाद्यांच्या आवाजाचं हॉर्न वाहनांमध्ये बसवणार' या केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेवर श्रवणतज्ज्ञांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:41 IST

पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर प्रसिद्ध श्रवण तज्ञ ...

ठळक मुद्देहॉर्न जर संगीतमय असेल तर त्याचा माणसाला सावध करण्याचा मुख्य उददेश पूर्ण होणार नाही

पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर प्रसिद्ध श्रवण तज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी आक्षेप घेतला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.        काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात वाहनांच्या हॉर्नच्या आवाजासंबंधी नियमांंमध्ये बदल करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मोटार वाहन उत्पादक कंपन्यांना हॉर्नच्या संगीतमय आवाजाबददल निर्देश देण्यात येणार आहेत. मात्र कुठलेही नवीन धोरण, कल्पना विज्ञानाधारित असावी असं सांगत डॉ. कल्याणी मांडके यांनी अँड असीम सरोदे, अँड अजितदेशपांडे, अँड अक्षय देसाई यांच्यामार्फत संबंधित मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.

आवाजासंबंधीची ही कल्पना नाविन्यपूर्ण आणि रंजक वाटत असली तरी त्याबददल सर्वकष विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नोटीशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हॉर्न हा रस्त्यावरील इतर वाहने, पायी चालणारी माणसे यांना सावध करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी असतो. हॉर्नचा आवाज हा ऐकण्याचा संकेत असून, ऐकण्याची कमी-अधिक क्षमता असणा-या सर्वांनाच ऐकू येईल अशा वारंवारितेच्या ध्वनिलहरींमध्ये असतो. तसेच त्याची तीवता देखील विशिष्ट पातळीची असायला हवी. सावधानतेचा इशारा देणारी प्रणाली म्हणून वापरात असलेला हॉर्न जर संगीतमय असेल तर त्याचा माणसाला सावध करण्याचा मुख्य उददेश पूर्ण होणार नाही, असा मुददा नोटीशीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

आपल्या देशातील रस्त्यावरील वाहने, पादचा-यांची संख्या, रस्त्या क्रॉस करताना आणि वाहतूक कोंडीत होणारा हॉर्नचा वापर या सगळ्याचा विचारकरता अशा परिस्थितीत सतत संगीतमय हॉर्न मोठ्या आवाजात चहू बाजूंनी ऐकू आल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल असेही नोटीशीमध्ये लक्षात आणून देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीbikeबाईकCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा