शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:12 IST

पुणे : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये सहा विधीसंघर्षित मुलांना देखील ...

पुणे : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये सहा विधीसंघर्षित मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना (दि. २१) रात्री पावणेआठच्या सुमारास नवी पेठेतील सलून व टॅटूच्या दुकानात घडली.

याप्रकरणी सनी विनोद महापुरे (वय १९, रा. फालेनगर कोथरुड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ऋषिकेश जालिंदर कांबळे (वय २१), यश संजय चव्हाण (वय २०, रा. दोघे, दत्तवाडी), प्रतीक युवराज शिंदे (वय १८, रा. मंगळवार पेठ), स्वराज निलेजय वाडेकर (वय २०, रा. नानापेठ), वैभव नितीन शहापूरकर (वय २०, रा. गवळीवाडी), देविदास बाळासाहेब गालफाडे (वय २२, रा. विश्रांतवाडी) या सहा जणांना अटक केली आहे. एकूण १२ जणांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी याचा भाऊ केएम ऊर्फ कानिफनाथ याची आरोपीपैकी एक असलेल्या विधीसंघर्षित मुलासोबत भांडण झाले होते. कानिफनाथ हा त्याला मोबाईलवर फोन करून सतत शिवीगाळ करत होता. त्यातूनच त्याने त्याच्या इतर साथीदारांना एकत्र करून केएमवर हल्ला करण्याचा बेत रचला. हे सर्वजण एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. केएम हा त्याच्या भावाच्या नवी पेठेतील झेड अ‍ॅण्ड ब्लॅक युनिसेक्स नावाच्या सलून आणि टॅटूच्या दकानात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार टोळक्याने दुकानात घुसून केएम समजून आतेभाऊ मिसाळ याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याने वार चुकवत मी केएम नाही असे म्हणत पळ काढला. त्यानंतर टोळक्याने दुकानाची काच फोडून हातात कोयता नाचवत आम्ही नाना पेठेतील भाई आहोत, आमच्या नादी लागले तर एकएकाला कापून टाकू असे म्हणत दहशत निर्माण केली. त्यावेळी घाबरून दुकादारांनी आपली दुकाने बंद केली. सुरुवातीला तक्रार देण्यास तक्रारदार समोर आला नव्हता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास केला असता, हा प्रकार समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.