नापास झाल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: June 9, 2015 05:17 IST2015-06-09T05:17:10+5:302015-06-09T05:17:10+5:30

दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने अल्पवयीन विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे.

The attempt of the student suicides due to incompetence | नापास झाल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नापास झाल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बारामती : दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने अल्पवयीन विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे.
आज दहावीचा निकाल होता. यामध्ये नापास झाल्याची माहिती संबंधित विद्यार्थ्याला समजली. त्यानंतर त्याच्या आईने नापास झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांसह त्याच्या कुटुंबियांनी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (वार्ताहर)

Web Title: The attempt of the student suicides due to incompetence