शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Video: भोंदू खरातची पुण्यात ‘माया’;चेक नाही, फक्त कॅश व्यवहार, मॉडेल कॉलनीत लेकीच्या नावे १.२० कोटींचा आलिशान फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:53 IST

पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत मालमत्तेच्या व्यवहारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पुणेभोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आता केवळ फसवणुकी पुरते मर्यादित न राहता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळत असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची चौकशी वेगात सुरू केली असून, त्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनी परिसरात आलिशान ३  बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे. २४ रत्नम या प्रीमियम सोसायटीतील सातव्या मजल्यावर असलेला हा सुमारे १०५५ चौरस फुटांचा फ्लॅट १३ सप्टेंबर २०२३  रोजी खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे.या व्यवहारातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित बिल्डरला तब्बल १  कोटी २०  लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याचा संशय आहे. सेल डीडमध्ये चेक किंवा बँक व्यवहाराचा कोणताही उल्लेख नसल्याने या व्यवहारावर संशयाचे सावट गडद झाले आहे. या आर्थिक व्यवहाराबाबत पोलीस तपास सुरु आहे.कोरेगाव पार्कमधील १ ५ ० कोटींची मालमत्ता संशयाच्या भोवऱ्यातया प्रकरणात अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे हेही तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील मोठ्या मालमत्ता व्यवहारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तपासात उघडकीस आले की, कोरेगाव पार्क परिसरात सुमारे ४९ गुंठे जागेवर १८  रो-हाऊस पोफळे यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.या मालमत्तेची बाजारातील किंमत सुमारे १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अधिकृत कागदपत्रांमध्ये ही मालमत्ता  २ ०२ ४  मध्ये केवळ १९  कोटी रुपयांना खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. बाजारभाव आणि दाखवलेल्या किंमतीतील मोठी तफावत लक्षात घेता हा व्यवहार संशयास्पद मानला जात आहे. विशेष म्हणजे, या परिसरात देशातील अनेक नामांकित उद्योगपतींचे बंगले असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान, प्रकाश पोफळे यांच्याकडे एवढा मोठा निधी आला कुठून? या व्यवहारांमध्ये अशोक खरातचा पैसा गुंतलेला आहे का? किंवा या मागे कोणते राजकीय आणि आर्थिक नेटवर्क कार्यरत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru Ashok Kharat's Wealth: Cash Deals, Daughter's Luxury Flat

Web Summary : Ashok Kharat's financial dealings are under scrutiny. His daughter owns a luxury flat in Pune's Model Colony, purchased with cash. His CA, Prakash Popale, is also being investigated for suspicious property deals worth crores in Koregaon Park, raising questions about financial irregularities and possible political links.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAshok Kharatअशोक खरातPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या