Success Story: आसमां को छुने की आशा..., अखेर यशस्वी, पुण्याच्या अशिताची पायलट परीक्षेत उत्तुंग भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 13:07 IST2024-07-14T13:05:20+5:302024-07-14T13:07:06+5:30
अशिताचे बालपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले अन् तिने देशात AIR 62 वा क्रमांक मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले

Success Story: आसमां को छुने की आशा..., अखेर यशस्वी, पुण्याच्या अशिताची पायलट परीक्षेत उत्तुंग भरारी
पांडुरंग मरगजे
धनकवडी : 'छोटीसी आशा...' हे गाणं महिलांच्या आकांक्षांना किती बळ देतं, याची प्रचिती भारती विद्यापीठ परिसरातील अशिता सोमवंशी हिच्या पायलट परीक्षेतील यशाने दिली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील अशिता सोमवंशी या धनकवडी येथील जेठेज् ॲकॅडमीच्या विद्यार्थिनीने असून तिने AME CET परीक्षेत देशात AIR 62 वा क्रमांक मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
अशिताचे वडील राजाभाऊ इंजिनीयर तर आई उज्वला शिक्षकेतर कर्मचारी आहेत. अशिताचे बालपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न होते. ११ वीमध्ये तीने जेठेज् ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि तिच्या स्वप्नाला जणू बळ मिळाले. केवळ AME CET मध्येच नाही तर IIT-JEE, SRM-JEE आणि VIT वेल्लोर सारख्या इतर स्पर्धा परीक्षांमध्येही अशिताने उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या यशामध्ये जेठेज् ॲकॅडमीद्वारे दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मोठा वाटा आहे. एन. आय.टी कर्नाटक चे माजी विद्यार्थी प्रा. आनंद जेठे आणि प्रा. दिपाली जेठे यांनी जेठे अकॅडमीमध्ये आता पर्यंत अनेक तरुणांच्या स्वप्नपूर्तीला साकार रूप दिले आहे.
आपल्या यशाविषयी मत व्यक्त करताना अशिता म्हणाली, "मी जेठेज् ॲकॅडमीची अत्यंत आभारी आहे, विशेषतः प्रा. आनंद जेठे, एम डी, राज्यपाल पुरस्कार विजेते फिजिक्स व गणिताचे प्राध्यापक, आणि प्रा. दीपाली जेठे, सीईओ व केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका, यांचे मार्गदर्शन, तसेच प्रशासकीय प्रमुख दिलीप सुर्यवंशी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही, माझ्या यशात महत्वाचा वाटा आहे."
पुणे हे शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेत मदत करते आणि देशाच्या प्रगती साठी योगदान देते. अशिताचे यशाचे उदाहरण हे समर्पित प्रयत्न आणि अपवादात्मक मार्गदर्शनाने काय साध्य होऊ शकते याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. - प्रा. आनंद जेठे