शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

By admin | Updated: August 4, 2015 03:02 IST

घणसोली येथील मॅकडोनाल्ड लुटण्यासाठी आलेल्या टोळीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका टेम्पोसह सुरा, कोयता, कटर जप्त करण्यात आले आहे.

नवी मुंबई : घणसोली येथील मॅकडोनाल्ड लुटण्यासाठी आलेल्या टोळीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका टेम्पोसह सुरा, कोयता, कटर जप्त करण्यात आले आहे. घणसोली स्थानकालगतच्या मॅकडोनाल्ड हॉटेलवर दरोडा पडणार असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल खताळ यांनी सापळा रचला होता. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मॅकडोनाल्ड परिसरात हा सापळा रचण्यात आला होता. या वेळी माहिती मिळालेल्या वर्णनाचा टेम्पो (एमएच २० सीटी ७८९४) त्या ठिकाणी येताच त्यांच्यावर झडप टाकली. या वेळी टेम्पोमध्ये चालकासह ७ जण लपून बसलेले आढळून आले. औरंगजेब खान (२१), सुनील पाल (२३), प्रेमचंद चव्हाण (१९), सिराज शेख (२०), मोहमद रशीद (२२), ममताज रंगरेज (२४) व हमीदराज खान (२२) अशी त्यांची नावे आहेत. झडतीमध्ये त्यांच्याकडे सुरा, कोयता, हॉकी, कटर व वायर असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. मॅकडोनाल्डवर दरोडा टाकण्यासाठी ते आल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार या सातही जणांना अटक करून त्यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सर्व जण वडाळ्याचे असून, त्यांच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक खताळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)