Pune: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून वाद; छातीत मारला ठोसा, तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:24 IST2025-08-07T12:23:01+5:302025-08-07T12:24:06+5:30
दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून गाडीची चावी न दिल्याने त्यांच्यात वाद झाला, वादाच्या रागातून एकाने दुसऱ्याच्या छातीत ठोसा मारला

Pune: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून वाद; छातीत मारला ठोसा, तरुणाचा मृत्यू
पुणे: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने दुसऱ्याच्या छातीत जोरात ठोसा मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.६) सायंकाळी लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सागर राजू अवघडे (३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सूरज नंदू सकट (२४, रा.लोहियानगर) याला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि सूरज हे नातेवाईक असून, मोलमजुरी करत होते. गाडीची चावी न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. वादाच्या रागातून सूरजने सागरच्या छातीत ठोसा मारला. यात सागर बेशुद्ध झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.