शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलच्या खासगीकरणावर प्रचंड टीकेनंतरही मंजुरी

By admin | Updated: September 27, 2016 04:35 IST

महापौर प्रशांत जगताप यांच्या प्रभागात असलेल्या छत्रपती शाहू महाराज दवाखान्याच्या खासगीकरणावर मुख्य सभेत प्रचंड टीका करण्यात आली. खासगीकरण कायदेशीर नसल्याचेही उजेडात

पुणे : महापौर प्रशांत जगताप यांच्या प्रभागात असलेल्या छत्रपती शाहू महाराज दवाखान्याच्या खासगीकरणावर मुख्य सभेत प्रचंड टीका करण्यात आली. खासगीकरण कायदेशीर नसल्याचेही उजेडात आले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान घेण्यास लावून भाजपा, शिवसेना व मनसेच्या मदतीने हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. आॅरकस हॉस्पिटलला एक रुपयाही भाडे न आकारता शाहू महाराज दवाखान्याची जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय पुकारण्यात आला. त्या वेळी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी दवाखान्याच्या खासगीकरणाबाबत प्रशासनाकडे माहिती मागविली. मुख्य सभेने दवाखाना भाड्याने देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. यासाठी केवळ एकाच हॉस्पिटलने टेंडर भरले, पुरेशी स्पर्धा झालेली नाही, तरीही आॅरकसला हॉस्पिटल भाड्याने देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसने हा प्रस्ताव मंजूर करण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर सभागृहनेते शंकर केमसे यांनी मतदान घेण्यास सांगितले. त्याला भाजपा, शिवसेना व मनसेने पाठिंबा दिल्याने ३८ विरुद्ध १५ मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला. छत्रपती शाहूमहाराज दवाखान्याची साडेसात हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली तीनमजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग सुरू असून इतर दोन मजले पडून आहेत. ही इमारत आॅरकसला पीपीपी तत्त्वानुसार चालविण्यास देण्यात आली असून रुग्णांवर अस्थिरोगचिकित्सा आणि आधुनिक पद्धतीने उपचार होणार आहेत. ३० वर्षांच्या कराराने ही इमारत आॅरकसला देण्यात आली असून त्यांच्याकडून भाडे आकारण्यात येणार नाही. दवाखान्यातील ४० टक्के म्हणजे १२ बेडवरील रुग्णांकडून आॅरकस स्वत:च्या नियमानुसार रक्कम आकारणार आहे. पालिका आॅरकसकडून सुमारे २० लाख ८२ हजार ५०० अनामत रक्कम आणि प्रोजेक्ट रकमेच्या ५ टक्के म्हणजे सुमारे ३० लाख रुपये घेणार आहे. आॅरकसला इमारतीची देखभाल, दुरुस्ती, मिळकतकर, आयकर, वीज पाणी बिल भरावे लागणार आहे.महापालिका दवाखाना चालविण्यास असमर्थ महापालिका दवाखान्याच्या अनेक सुसज्ज इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अल्प दरात आरोग्य सुविधा पुरविल्या जाणे आवश्यक असताना त्यांचे खासगीकरण करून भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. महापालिका दवाखाना चालविण्यास असमर्थ आहे हे जाहीर करा, अशी तीव्र भावना या वेळी सभासदांनी व्यक्त केली.