नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 03:32 PM2023-11-13T15:32:59+5:302023-11-13T15:33:20+5:30

नीरेच्या भर बाजारपेठेतील घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याने नीरा शहरात भितीचे वातावरण

An extreme step taken by a married woman from Neera The funeral was done in front of Maher's residence | नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी

नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी

नीरा : नीरा येथील सत्तावीस वर्षीय विवाहिता निकीता चैतन्य घुले हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आली आहे. रविवारी दुपारी गळफास घेतल्यानंतर लोणंदच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, पण ती मृत घोषित करण्यात आली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास घुले यांच्या नीरेच्या भर बाजारपेठेतील घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याने नीरा शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. 

       या प्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, जालिंदर बबन सावंत (वय ५०) वाघळवाडी (ता. बारामती) यांनी लोणंद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार नीरा येथील फिर्यादीची सख्खी पुतणी निकिता चैतन्य घुले (वय २७) रा. नीरा वार्ड नं दोन हि लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी ॲडमिट असल्याचा फोन दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी फिर्यादी जालिंदर सावंत यांना आदित्य घुले यांनी करून तातडीने लोणंद येथे बोलावून घेतले. सावंत लोणंदच्या खाजगी रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेले आदित्य घुले व आबा घुले यांना निकिताच्या तब्येतीबद्दल विचारले असता त्यांनी तुमच्या पुतणीने घरामधेच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले. 

त्यानंतर फिर्यादी सावंत यांनी दवाखान्यात जावून पाहिले असता त्यांना आपली पुतणी मृत झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात जावून या घटनेबाबतची फिर्याद दिली. लोणंद अधिक तपास करीत आहेत. 

निकिता घुले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर वाघळवाडीच्या सावंत कुटुंबातील सदस्यांनी नीरेत संताप व्यक्त केला. युवकांनी नीरेच्या भर बाजारपेठेतील घुले यांच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याची भुमिका घेतली. नीरेतील व वाघळवाडीतील जेष्ठांनी युवकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण युवकांनी घुले यांच्या राहत्या घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात निकिता यांचा अंत्यविधी केला. या घटनेमुळे परिसरातील लोक भयभीत झाले होते. पोलीसांनी सुरक्षेच्या दृष्टीने घुले कुटुंबातील युवकांना जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले होते.

Web Title: An extreme step taken by a married woman from Neera The funeral was done in front of Maher's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.