Video: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिका थांबवली; हा तर निर्दयीपणाचा...; शरद पवार गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:36 IST2025-03-24T13:35:55+5:302025-03-24T13:36:36+5:30
व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली सरकराने पुणेकरांची पिळवणूक थांबवावी ही नम्र विनंती

Video: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिका थांबवली; हा तर निर्दयीपणाचा...; शरद पवार गटाची टीका
पुणे : पुण्यातील अलका चौकात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचा ताफा जात असताना वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारचा व्हिडिओ शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. हा निर्दयीपणाचा एकूणच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे सांगत त्यांनी व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली पुणेकरांची पिळवणूक थांबवावी अशी नम्र विनंती सरकारला केली आहे.
काल सायंकाळी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस गणेश कला सभागृहात सहकार विभागाच्या कार्यक्रमाला जाताना अलका चौकामधून गाड्यांचा ताफा गेला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकेला थांबून ठेवले. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावरून जगताप यांनी व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.
माणुसकीचे कर्दनकाळ... महायुती सरकार !
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) March 24, 2025
सत्तेची लालसा अन् वर्चस्व सिद्ध करण्याची चढाओढ इतकी तीव्र आहे की या नेत्यांना जनतेच्या सुख-दुःखाचा विसरच पडला आहे.
काल अलका चौकात मंत्री महोदयांच्या ताफ्याचा थाट पूर्ण करण्यासाठी अँब्युलन्सलाही ताटकळत ठेवण्यात आलं. pic.twitter.com/5UXz4ESs9r
जगताप म्हणाले, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. याठिकाणी आम्ही लाल दिव्याची गाडी बंद करत आहोत. अशी गर्जना त्यांनी केली. पण त्याच्यानंतर व्हीआयपी कल्चर बंद झालेलं दिसलं नाही. शेवटी हा त्या सरकरचा निर्णय आहे. पण त्या कल्चर मध्ये सर्वसामान्यांचे जिणं अवघड होऊ नये. एवढीच आमची आर्त मागणी आहे. काल पुण्यात मोदी सरकारचे शिष्य देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जाण्याकरिता वेगवगेळ्या भागातून वाहतूक कोंडी करण्यात आली. ज्यामध्ये अलका चौकात रुग्णवाहिका सरकारने थांबवून ठेवली. हा निर्दयीपणाचा एकूणच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्यांनी त्यांचं व्हीआयपी कल्चर जपावं. फक्त यामुळे कोणत्याही पुणेकरांचा जीव जाऊ नये याची काळजी घ्यावी. एवढीच त्यांना हात जोडून विनंती आहे. कृपया या व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली पुणेकरांची पिळवणूक थांबवावी हीच नम्र विनंती जगताप यांनी यावेळी केली आहे.