शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात युतीचे जागांवरून घोडे अडले

By admin | Updated: January 25, 2017 01:38 IST

राज्यात, जिल्ह्यात युती किंवा आघाडीबाबात कोणताही निर्णय होताना दिसत नाही. असे असले तरी आंबेगाव पंचायत समिती

मंचर : राज्यात, जिल्ह्यात युती किंवा आघाडीबाबात कोणताही निर्णय होताना दिसत नाही. असे असले तरी आंबेगाव पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेना व भाजपाचे स्थानिक नेतृत्व सकारात्मक असल्याचे दिसते. आघाडीबाबात राष्ट्रवादी व काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहेत. मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपा व काँग्रेस पक्ष स्वबळावर लढले होते. मात्र खरी लढत राष्ट्रवादी व शिवसेनेत झाली. भाजपा व काँग्रेसच्या उमेदवारांना दोन मुख्य पक्षांच्या तुल्यबळ लढतीत कमी मते मिळाली होती.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगूल वाजताच आघाडी अथवा युती होणार का, याची चर्चा सुरू झाली. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष भक्कम स्थितीत आहेत. भाजपाची ताकद मागील काही दिवसांपासून वाढू लागली आहे. काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार कायम आहे. त्यामुळे निदान पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी प्रमुख पक्षांना इतर पक्षांची मदत होऊ शकेल, असे जाणकार सांगतात. सुरुवातीस युती अथवा आघाडीबाबत चर्चा सुरू होती. मात्र नंतर चर्चा पुढे गेलीच नाही. काँग्रेसची ताकद मर्यादित आहे, जरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार असला तरी राष्ट्रवादी काँगे्रसची ताकद पाहता ते काँग्रेसशी आघाडी करण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे भाजपाची ताकद काही प्रमाणात वाढू लागली आहे. भाजपा स्वतंत्र लढल्यास तो शिवसेनेची मते खाईल व त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. अर्थात भाजपाची अवास्तव जागांची मागणी शिवसेना मान्य करेल का, हा प्रश्न आहे. (वार्ताहर)