शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेगव्हाण येथे आंबेडकरांच्या विचारांचा आखाडा

By admin | Updated: May 9, 2017 03:27 IST

नवचेतना मित्र मंडळाच्या वतीने सिद्धेगव्हाण येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेचे पुणे

लोकमत न्यूज नेटवर्ककडूस : नवचेतना मित्र मंडळाच्या वतीने सिद्धेगव्हाण येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजयशेठ देखणे यांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजे व संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित अतिशय दुर्मिळ माहितीसह इतिहास स्पष्ट केला़ प्रसंग आणि संदर्भ यांच्या आधारे आपल्या प्रभावी विचारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले़ सालाबादप्रमाणे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सिद्धेगव्हाण गावी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन असते़ परंतु ग्रामस्थ यात्रा कमिटी सदस्यांनी या वर्षी कुस्त्यांच्या आखाड्याऐवजी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आखाडा भरवून त्यांची जयंती साजरी केली़ कार्यक्रमात जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या निर्मला पानसरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या़ जिल्हा परिषदेवर त्यांची बहुमताने निवड झाल्याने नवचेतना मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला़ वर्षभरात सिद्धेगव्हाण गावी बुद्धविहार बांधून देण्याचे आश्वासन निर्मला पानसरे यांनी सत्कारप्रसंगी दिले़ या कार्यक्रमांचे आयोजन रमेशजी थोरात, मित्रमंडळाचे सदस्य, खेड तालुक्यातील विविध पक्ष व संघटन कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते़ त्यामध्ये आदर्श सरपंच शशिकांत मोरे, मनोहर भालेराव, गौतम कदम, शिवशांत गायकवाड, रिपब्लिकन अध्यक्ष खेड, दत्ता कांबळे, मा़ महेंद्रनाथ नवरे, देवेंद्र ओव्हाळ, अनिल कांबळे, बापूसाहेब थिटे, सुनंदाताई नाईकनवरे, बचत गटांच्या अध्यक्षा सुनीताताई कांबळे, मायाताई गायकवाड, सुभाष कदम, विशाल शिंदे, किसनजी रोकडे, उमेश मोरे, बौद्धाचार्य पी. के़ पवार, गंगाराम गायकवाड, शेखर शिंदे, संतोष कांबळे, पंकज हरगुडे, कुमार नवरे, महादेव गंगावणे, विजय कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते़ सूत्रसंचालन धम्मप्रबोधन सुधाकरजी अभंग यांनी केले़