शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार

By राजू हिंगे | Updated: June 10, 2025 19:54 IST

निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे, पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, पक्षात गटातटाला थारा नाही

पुणे : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः महापालिका निवडणुकीत मुंबईत एक सदस्यीय वॉर्ड, तर अन्य ठिकाणी चार सदस्यीय प्रभाग रचना असु शकते. ही प्रभाग रचना स्वीकारण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल, अन्यथा त्यांच्या मतानुसार निवडणुकीला सामोरे जावू असे सांगतानाच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. पक्षात गटातटाला थारा नाही. पक्ष एक परिवार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट २६ वा वर्धापन दिन सोहळाचा कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुण तरुणींना, महिलांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. मुबंई महापालिकेत मध्ये एकचा तर अन्य पालिकेत चारचा असणार आहे. आता काहींचे मतप्रवाह वेगळे असतील.जसे प्रभाग ठरतील, तशी मानसिक तयारी ठेवा. सर्व समाजघटकांच्या लोकांना सभासद नोंदणीत सहभागी करून घ्या.मोठ्या जिल्ह्यांनी ५ लाखांपेक्षा जास्त सभासद नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करावे. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा आणि सुसंस्कृत राजकारणाची जडणघडण केली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला अधिक जोमाने करायचं आहे. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकावर असावं, हा आपला प्रयत्न आहे.अनेक कार्यकर्ते, सहकारी आहेत शेवटी आपल्याला काम करायचं आहे. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेलं आहे. आता जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जावू द्यायचा नाही. तशा पद्धतीने आपल्या सगळ्याचं काम सुरू झालेलं आहे,असे अजित पवार यांनी सांगितले.

अरे पैसे सोडत नाही.. काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय?

कधीकधी काही काहीजण अशा बातम्या सोडतात, की अजित पवार पैसे सोडत नाहीत. अरे पैसे सोडत नाही.. काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय? शेवटी राज्य सरकराने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही २० ट्कके सोडतो, दुसऱ्या तिमाहीत ४० ट्कके सोडतो, तिसऱ्या तिमाहीत ६० टक्के सोडतो. नंतर ८० टक्के आणि शेवटच्या महिन्यात १०० टक्के. या पद्धीतचे ते नियोजन केलेल असते.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024