शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत पार्किंग महागले

By admin | Updated: September 8, 2014 04:11 IST

संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री़ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीने पावन झालेल्या अलंकापुरीमध्ये वाहनतळाच्या नावाखाली वारकऱ्यांची लूट सुरू आहे़

आळंदी : संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री़ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीने पावन झालेल्या अलंकापुरीमध्ये वाहनतळाच्या नावाखाली वारकऱ्यांची लूट सुरू आहे़ पार्किंगचे दर जवळपास दुप्पट झाल्याने भाविक नाराजी व्यक्त करीत आहेत.संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगातून दररोज हजारो भाविक अलंकापुरीत येतात. त्यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था नगरपरिषदेमार्फत झाडीबाजार येथे करण्यात येते. यापूर्वी सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षासाठी मे़ शिवसाई इंटरप्रायजेस या ठेकेदारामार्फत पार्किंग ठेके देऊन करारानुसार जुन्या दराप्रमाणे वसुली केली जात होती़ परंतु संबंधित ठेकेदाराला कराराप्रमाणे जागा न दिल्यामुळे संबंधित ठेकेदार दि़ १/४/२०१४ रोजी न्यायालयात गेला़ त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदारास मुदतवाढ दिली़ परंतु त्यानंतर अचानकपणे त्याचा ठेका बंद करण्याचे आदेश नगर परिषदेने दिले व नवीन दराने वारकऱ्यांची लूट सुरू केली आहे़याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना विचारण्यासाठी गेले असता, ते सुट्टीमुळे उपस्थित नव्हते़या बाबत नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांना विचारले असता, जुन्या ठेकेदारास जागा न मिळाल्यामुळे तो न्यायालयात गेला आहे़ परंतु जागा उपलब्ध करुण देणे हे प्रशासनाचे काम आहे, असे ते म्हणाले़ प्रशासनास दि़ २५/८/२०१४ च्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित ठेकेदाराची थकबाकी भरुन घेऊन त्यास ठेका देण्यात यावा असा ठराव क्ऱ २६३ सर्वानुमते मंजूर झाला आहे़ तरीही त्याचा ठेका का बंद केला हे माहीत नाही़ नवीन दराप्रमाणे नगर प्रशासन दररोज सरासरी दहा हजार रुपये कमवित असून वारकऱ्यांची व भाविकभक्तांची लूट करीत आहे, असे नागरिक बोलत आहेत़ (वार्ताहर)