बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:18 IST2026-02-06T15:18:40+5:302026-02-06T15:18:57+5:30

पूर्णाकृती पुतळा, आगामी काळात सदैव आदरणीय अजितदादांच्या जनसमर्पक कार्याची साक्ष व प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांना देत राहील

Ajit Pawar's full-length statue to be erected in Baramati; Pawar family meets with Sharad Pawar | बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक

बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा विद्या प्रतिष्ठानच्या आवारात उभारण्यात येणार आहे. याबाबत गुरुवारी (दि. ५) ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंबीयांची बैठक विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडली.

विद्या प्रतिष्ठानमध्ये आयोजित बैठकीला शरद पवार यांच्यासह प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रणजीत पवार, पार्थ, जय पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त किरण गुजर तसेच विद्या प्रतिष्ठानचे अन्य संचालक उपस्थित होते. यामध्ये पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर कुटुंबीयांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी कार्यक्रमस्थळी जात अभिवादन केले. त्यानंतर यामध्ये पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पुर्णाकृती पुतळ्याच्या कामाच्या आराखड्याचीही यावेळी पाहणी केली गेली. संबंधित कामांचा आराखडा तातडीने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे स्मारक युध्दपातळीवर उभारले जाणार असल्याचे संकेत आहेत. ज्या ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या विद्या प्रतिष्ठान मैदानावरच पुर्णाकृती पुतळा उभारला जाण्याची अधिक शक्यता आहे. बारामतीचे सुपुत्र, महाराष्ट्राचे विकासपुरुष आदरणीय अजितदादा पवार यांच्या उत्तुंग कार्याला व व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञतापूर्वक मानवंदना म्हणून त्यांच्या जन्मभूमीत साजेसा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात यावा, अशी दृढ जनभावना होती, त्यातूनच ही कल्पना आकार घेत आहे. हा पूर्णाकृती पुतळा, आगामी काळात सदैव आदरणीय अजितदादांच्या जनसमर्पक कार्याची साक्ष व प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांना देत राहील, असा ठाम विश्वास असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

...सलग दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार सहयोग निवासस्थानी

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सलग दुुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी उपस्थित होते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामती येथील सहयोग या निवासस्थानी राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहिले. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांच्या सहवेदना संपूर्ण पवार कुटुंबीयांनी एकत्रितपणे स्वीकारल्या. गेल्या दोन दिवसांपासून पवार कुटुंबीय एकत्र येत आहेत. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक हा एकमेव विषय या कुटुंबीयांच्या चर्चेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या पवार कुटुंबीय या कठीण प्रसंगात एकमेकांना साथ देत एकोप्याने सामोरे जात आहेत.

Web Title : बारामतीत अजित पवारांचा पुतळा उभारणार; पवार कुटुंबीयांची बैठक

Web Summary : बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी योजनांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली आणि अंत्यसंस्कार स्थळाला भेट दिली. हे स्मारक पवारांच्या योगदानाला आदराने उजाळा देईल आणि भावी पिढीला प्रेरणा देईल. या कठीण समयी कुटुंब एकजूट आहे.

Web Title : Ajit Pawar's Statue to Be Built in Baramati; Family Meeting Held

Web Summary : Ajit Pawar's full-size statue will be erected at Vidya Pratishthan, Baramati. The Pawar family, including Sharad Pawar, met to discuss the plans and visited the cremation site. The memorial will honor Pawar's contributions and inspire future generations. The family is united in this difficult time.