शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; माळेगावात अपक्षांनी अजितदादांना दिली 'काटे की टक्कर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:52 IST

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

Malegaon Nagar Parishad Election Result 2025:पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बारामती, इंदापूर आणि भोरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीने झेंडा फडकवला असला तरी, सर्वांचे लक्ष लागलेल्या माळेगाव नगरपंचायतीत मात्र विजयासोबतच एका मोठ्या राजकीय संघर्षाची चर्चा पाहायला मिळत आहे.

माळेगावात युतीची सत्ता, पण अपक्षांची हवा

माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचे कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्याशी युती करून राजकीय धक्का दिला होता. या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुयोग सातपुते यांनी ११ हजार मतांच्या आघाडीसह दणदणीत विजय मिळवला. माळेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ८ जागा मिळाल्या आहेत. तर रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादी पुरस्कृत प्रमोद तावरे हे देखील या निवडणुकीत निवडून आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे माळेगावात अपक्ष उमेदवारांच्या माळेगाव विकास आघाडीने ५ जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गट आणि स्थानिक नेत्यांनी लावलेल्या ताकदीमुळे राष्ट्रवादीला सर्वच्या सर्व १७ जागा जिंकण्यात अपयश आले. दीपक तावरे यांच्या नेतृत्वाखालील ५ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत अजितदादांच्या गडाला खिंडार पाडले आहे.

प्रभाग ९ मध्ये ईश्वरचिट्ठीचा कौल

माळेगावमधील प्रभाग ९ ची लढत अंगावर काटा आणणारी ठरली. गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना ६१६-६१६ अशी समान मते पडली. शेवटी ईश्वरचिट्ठी काढण्यात आली, ज्यात नशिबाने साथ दिल्याने अपक्ष उमेदवार जयश्री तावरे यांना विजयी घोषित करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे निकाल

इंदापूर: हर्षवर्धन पाटलांना धक्का देत इंदापूर नगरपालिकेत अजित पवार गटाने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा यांनी भाजपच्या प्रदीप गारटकर यांचा अवघ्या १२० मतांनी पराभव केला. या निकालामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.

भोर: संग्राम थोपटेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग भोरमध्येही नाट्यमय निकाल पाहायला मिळाला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामचंद्र आवारे १७० मतांनी विजयी झाले. इथे भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. पण नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा निवडून आला आहे. यामुळे आमदार संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बारामती: बारामती नगरपरिषदेत पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीची आघाडी पाहायला मिळाली. अनुप्रिता तांबे यांची बिनविरोध निवड झाली. तर अविनाश निकाळजे आणि मनीषा चव्हाण यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार; अजित पवारांनी दिला होता इशारा

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी निधीवरुन भाष्य केलं होतं. "अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे परंतु वाटप  करत असताना जसं पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं तसं वाढपी तुमच्या समोर उभा आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि चौदाशे कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्ही सांगितलेलं सगळं द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही तिथे काठ मारली तर मी पण काठ मारणार. तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे. मग बघा काय ते," असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Independents Challenge Ajit Pawar in Malegaon Nagar Panchayat Elections

Web Summary : Despite NCP's dominance in Pune, Malegaon saw a close contest. Ajit Pawar's alliance won, but independents secured significant seats, challenging his authority. Close contests and fund allocation warnings marked the election.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Ajit Pawarअजित पवारZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Puneपुणे