पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानअपघाताप्रकरणी पायलट सुमित कपूर याची चूक आहे. माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असा जबाब व्ही एस आर कंपनीचा मालक व्ही.के सिंग यांनी सीआयडीने केलेल्या चौकशीत दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानअपघातानंतर सातत्याने आमदार रोहित पवार यांनी अपघातांनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांनी कंपनीतल्या त्रुटी समोर आणल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेली घटना हा घातपात असल्याचे आरोप केले .या व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी बारामती पोलीस ठाण्या बाहेर आंदोलन केले. तसेच या अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीबाबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे देखील आता आवाज उठवू लागले आहेत. या अपघाताचा तपास हा पहिल्याच दिवशी सीआयडीकडे देण्यात आला. सीआयडी कार्यालयात येऊन रोहित पवार यांनी याबाबत जबाब नोंदविला. यात व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची या अपघाताबाबत सीआयडीने तीन दिवस चौकशी केली. मात्र नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली होती. या चौकशीदरम्यानच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा असा जबाब त्यांनी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's plane crash, VSR owner V.K. Singh told CID to punish him if he's at fault. Rohit Pawar raised concerns, alleging foul play. Investigation ongoing.
Web Summary : अजित पवार के विमान दुर्घटना के बाद, वीएसआर के मालिक वी.के. सिंह ने सीआईडी से कहा कि दोषी होने पर उन्हें सजा दी जाए। रोहित पवार ने गड़बड़ी का आरोप लगाते हुए चिंता जताई। जांच जारी है।