पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) केली जाणार आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथील विमानतळाजवळ विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. याप्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, केवळ त्याचाच तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. दरम्यान, विमान अपघाताची चौकशी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आधिपत्याखाली यंत्रणेकडून चालू आहे.
बारामतीत झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्यासह विमानातील पाचही जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. त्यात वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी आणि अजित पवारांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी, बारामती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. अजित पवार यांच्यासह एकूण ४ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयावह होता कि, विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
Web Summary : The CID will investigate the accidental death of Ajit Pawar in a plane crash near Baramati. The accident, which occurred on January 28th, also killed four others. A sudden death case has been registered. Aviation authorities are also investigating the crash.
Web Summary : बारामती के पास विमान दुर्घटना में अजित पवार की आकस्मिक मौत की जांच सीआईडी करेगी। 28 जनवरी को हुई दुर्घटना में चार अन्य लोगों की भी मौत हो गई। आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया गया है। विमानन प्राधिकरण भी दुर्घटना की जांच कर रहे हैं।